Palghar Nargrik

Breaking news

पालघर जिल्ह्याच्या वाहतूक शाखेसाठी २५ पोलिस अधिकारी, अंमलदार यांच्या नियुक्तीला परवानगी मिळाल्याने आता वाहतुकीवर नियंत्रण राखणे सुलभ होणार आहे……

पालघर जिल्ह्यातून मुंबई-अहमदाबाद मार्ग, वाडा औद्योगिक क्षेत्र, तारापूर औद्योगिक क्षेत्र, वाहतूक कोंडीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आतापर्यंत अनेक बैठका पार पडल्या. अनेक उपाययोजना केल्या तरीही वाहतूक समस्या सुटू शकली नाही. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम आणि पोलिस विभागाच्या समन्वयातूनही हा महत्त्वपूर्ण प्रश्न कायम आहे. ठाणे येथे वाहतूक विभागाचे प्रमुख असणाऱ्या बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती पालघरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी वाहतुकीच्या समस्येला गंभीरपणे घेतले आहे. त्यानुसार त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी नियोजनात्मक आखणी केली आहे. त्यानुसार वाहतूक विभागाचे कामकाज सुरू ठेवण्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या २५ पदाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविल्याने दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, पाच पोलिस हवालदार, तेरा पोलिस शिपाई, पाच चालक असा अधिकारी कर्मचारी वर्ग मंजूर झाला आहे.

पालघर शहरासह बोईसर, वाडा, डहाणू, या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून सुटली नव्हती. जिल्ह्याची निर्मिती होऊन सहा वर्षे झाली, मात्र स्वतंत्र वाहतूक शाखेची स्थापना झाली नव्हती. मात्र आता नव्याने आलेले जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे ठाणे येथे वाहतूक शाखेचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाऊल उचलत जिल्ह्याची वाहतूक शाखा स्थापन केली आहे. वाहतूक शाखा स्थापन झाल्यामुळे आता वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

तसेच पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांची NH 48 चे मेंबर पालघर नागरिकचे संपादक जावेद लुलानिया व हरबंस सिंग नन्नाडे (पप्पू) यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व महामार्ग ॲथोरिटीवर जे काही दिवसा पासून कठीण प्रसंग आहेत.(उदा) महामार्गवर क्रेन, रुग्णवाहिका,अग्निशामक दल,महामार्गवर ह्या सुविधा नसल्यामुळे त्यांनी ह्या सुविधा उपलब्ध करून द्यावा यासाठी पत्र देण्यात आले.

Leave a Comment