Palghar Nargrik

Breaking news

ऐन सणात मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा फटका, CNG आणि PNG दरात वाढ……

मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसलाय. मुंबई आणि परिसरात महानगर गॅसने या दरवाढीची घोषणा केली. मुंबईत सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात 6 तर पीएनजीच्या दरात 4 रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून नवीन दरवाढ अंमलात येणार आहे.

या दरवाढीनंतर मुंबईत सीएनजीची किंमत प्रति किलो 86 रुपये इतकी झालीय तर पीएनजी गॅसची किंमत 52 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे.1 ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायूच्या आयात किमतीमध्ये 40 टक्क्यांची वाढ झाली होती. त्यानंतर या किमतीमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. त्यानुसार काल या दरवाढीची घोषणा करण्यात आली.

महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या (CNG) दरात प्रति किलो 6 रुपयांची वाढ केली आहे. याशिवाय पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या एलपीजी (PNG) च्या किमतीतही प्रति युनिट 4 रुपयांनी (SCM) वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. या बदलामुळे मुंबई आणि परिसरातील वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसची (CNG) किरकोळ किंमत 86 रुपये प्रति किलो झाली आहे.

पीएनजी चा दर 52 रुपयांच्या वर
याशिवाय, घरगुती पीएनजीची किंमत प्रति एससीएम 52.50 रुपये झाली आहे . सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, सरकारने १ ऑक्टोबरपासून गॅसच्या किमती 40 टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पेट्रोलियम किंमत आणि विश्लेषण कक्षाने 30 सप्टेंबर रोजी 1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतींमध्ये 40 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती.

सीएनजी-पेट्रोलमधील किमतीतील बचत 45 टक्क्यांवर आली. आधी 1 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय किमतीचा हवाला देत गॅसच्या किमती 110 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या होत्या. सरकार वर्षातून दोनदा 1 एप्रिल आणि 30 सप्टेंबर रोजी गॅसच्या किमतीत सुधारणा करते. एमजीएलने सांगितले की, या दरवाढीनंतर सीएनजी आणि पेट्रोलमधील किमतीतील बचत 45 टक्क्यांवर आली आहे. त्याच वेळी, पीएनजी आणि एलपीजीमधील हा फरक केवळ 11 टक्के राहिला आहे.

दरवाढ होण्याची शक्यता
किमती आणखी वाढू शकतात. त्याचबरोबर एलपीजीच्या किमतीत प्रति युनिट 6 रुपयांनी वाढ होऊ शकते. सरकारने गेल्या आठवड्यात जुन्या गॅस फील्डमधून तयार होणाऱ्या गॅससाठी दिलेला दर सध्याच्या 6.1 प्रति डॉलर दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट (प्रति युनिट) वरून 8.57 प्रति डॉलर युनिट इतका वाढवला आहे.

Leave a Comment