जिल्हा परिषद पालघर येथे आज दिनांक ३१/१०/२०२२ रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, भानुदास पालवे यांनी दोन्ही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तसेच यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता शपथ घेण्यात आली.
इंदिरा प्रियदर्शिनी गांधी (पूर्वाश्रमीच्या नेहरू ; १९ नोव्हेंबर १९१७ – ३१ऑक्टोबर १९८४) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल हे भारत छोडो आंदोलनात आघाडीवर होते. वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापने करीताही त्यांनी कार्य केले.
अशा थोर व्यक्तींची जयंती आज जिल्हा परिषद येथे साजरी करण्यात आली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) संघरत्ना खिल्लारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता (बांधकाम) नितीन भोये,कार्यकारी अभियंता (पापु) गंगाधर निवडुंगे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक) प्रवीण भावसार, जिल्हा कृषी अधिकारी सूरज जगताप तसेच
सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.