Palghar Nargrik

Breaking news

काय आहे Two Finger Test, व्हर्जिनीटी तपासणाऱ्या या चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी…..

सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय देत बलात्कार आणि शारीरिक अत्याचार प्रकरणांमध्ये केल्या जाणाऱ्या “टू-फिंगर टेस्ट”वर बंदीचे आदेश दिले आहेत. ही टेस्ट केल्यास तो कायदेशीर गुन्हा असून, दोषींना शिक्षा होईल असंही न्यायालयानं खडसावलंय. आजच्या दिवसांमध्येही ही Two Finger Test केली जाण्याविषयी न्यायालयानं खंत व्यक्त केली. ही चाचणी नेमकी काय, त्यामध्ये काय करतात यासंबंधीचे प्रश्न न्यायालयाच्या या सुनावणीनंतर उपस्थित झाले.

काय असते ही Two Finger Test?

टू-फिंगर टेस्टमध्ये पीडितेच्या गुप्तांगात दोन बोटं आत घातली जातात, या माध्यामातून त्यांची कौमार्य (verginity test) घेतली जाते. महिलेनं कोणाशी शारीरिक संबंध ठेवले आहेत की नाही, यासाठी ही चाचणी घेतली जाते.

चाचणीमध्ये पीडितेच्या शरीरात सहज दोन बोटं गेली असता ती Sexually Active असल्याचं मानलं जातं. यातूनच पुढे ती व्हर्जिन आहे की नाही याचे पुरावे सादर होतात.

Leave a Comment