मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुबई महापालिका (BMC) निवडणुकीपुर्वी कुप्रसिद्ध डॉन तथा डॅडी अरुण गवळी (Don Arun Gawli) याला संचित रजा मंजूर केली आहे. (Maharashtra News in Marathi) त्यामुळे तो चार महिन तुरुंगाबाहेर राहणार आहे. डॉन गवळी याला संचित रजा मंजूर केल्यास मनपा निवडणुकीवर तो प्रभाव पाडेल, अशी कारण देत नागपूर मध्यवर्ती कारागृहाने रजेचा अर्ज फेटाळला होता. या विरोधात गवळीने नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. गवळी प्रभाव पाडू शकतात, याबाबतचे पुरावे नसल्याने ही सबब काल्पनिक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात गवळीला जन्मठेप
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे अॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. अरुण गवळी याला न्यायालयाने संचित रजा मंजूर केल्यामुळे आता पुढील चार महिने डॉन कारागृहाबाहेर राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चार आठवड्यांची संचित रजा (फरलो) अरुण गवळी याला मंजूर केली आहे.
गवळीचा संचित रजा मिळावी म्हणून कारागृह प्रशासनाकडे अर्ज
अरुण गवळी याने कुटुंबीयांना भेटण्यासाठी संचित रजा मिळावी म्हणून कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळ्यात आला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेत फौजदारी याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यांची रजा मंजूर करण्याबाबत निर्णय दिला. त्यामुळे गवळी याची रजा मंजूर झाली आहे.
अरुण गवळी किमान आठ वेळा तुरुंगातून बाहेर
दरम्यान, संचित रजा मंजूर केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यात येईल, अशी हमी देण्यात आली. तसेच यापूर्वीच्या रजेच्या वेळी कोणताही गुन्हा घडलेला नाही, असा दावा करण्यात आला. याचा विचार करुन न्यायालयाने संचित रजा मंजूर केली. अरुण गवळी हा यापूर्वी किमान आठ वेळा तुरुंगातून बाहेर आला आल्याची माहिती आहे.
याप्रकरणी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती. या नोटीशीवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेत गवळी याला चार आठवड्यांची संचित रजा मंजूर केली आहे. त्यामुळे गवळी आता न्यायालयाबाहेर येईल.