Palghar Nargrik

Breaking news

अतिक्रमण हटविण्यास अपयशी ठरलेले तहसिलदार सुनील शिंदेंच्या विरोधात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात…..

पालघर-  पालघरचे तहसिलदार सुनील शिंदे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी गुरचरण जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याबाबत कंपनी मालकाला पाठीसी घालून अतिक्रमणाला संरक्षण दिले असल्याने त्यांचे विरोधात 1 जानेवारी 2023 पासून जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालया समोर बेमुदत आंदोलन/उपोषण छेडण्यात येणार आहे.
मौजे नवली पालघर येथील सर्वे क्र- 48 वरील 70 गुंठे जमिनीवर डिलक्स रिसायकलींग कंपनीच्या मालकाने या शासकीय यंत्रणेला विकत घेवून त्यावर कारखाना उभारला आहे. या अगोदरच्या तहसिलदाराने व आताच्या तहसिलदाराने या दोन्ही तहसिलदारांनी या कारखानदाराशी हातमिळवणी करत या बांधकामाला संरक्षण देवून महसूल विभागाचे नाव उंचाविण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांनी या विरोधात एक दिवसीय उपोषण ही केले होते. तसेच सुनील शिंदे यांची तक्रार उप.विभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पालघर, जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडेही केली होती. परंतु या दोन्ही अधिकार्‍यांच्या आदेशालाही तहसिलदारांनी केराची टोपली दाखवली आहे. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास कायदेशीर बाब पडताळून पाहणे गरजेचे असताना तसेच मंडळ अधिकार्‍यांनी दोन वेळेस अतिक्रमण हटविण्याबाबत अहवाल सादर केले असतानाही अद्याप पर्यंत कारवाई होत नाही. ही महसूल विभागाला न शोभणारी घटना आहे. व महसूल विभागाची शोकांतीका आहे.
तहसिलदार सुनील शिंदेंच्या विरोधात उप.विभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पालघर यांचे 18/9/2022 चे आदेश आहेत. तरीही तहसिलदार सुनील शिंदे कारवाई करण्यास टाळा-टाळ करत आहेत.

Leave a Comment