औरंगाबाद दि 1 (जिमाका) सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांनी शेतीत केलेल्या नव्या प्रयोगाचे त्यांनी कौतुकही केले.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
• 600 पेक्षा जास्त स्टॉल्स
• 99 विविध प्रात्यक्षिके
• आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
• शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण
• यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा
• 32 विविध चर्चासत्रे
• आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे राज्यस्तरीय उद्घाटन
विशेष सहभाग
•महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
• वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी
• डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली
• डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
• महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला
• महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळ मुंबई
Orchids Marriage and Party Hall
095189 66109
https://maps.app.goo.gl/S9UVjt2keB1ndH3x6