प्रतिनिधि प्रतीक मायेकर
पोलिसांनी ३ तरुणांना ताब्यात घेतलं अन् मोठं घबाडच हाती लागलं; वाहन बाजार भरवता येईल एवढ्या दुचाकी जप्त…..
याबाबत पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांनी मोटर सायकल चोरीचे वाढते गुन्हयांबाबतचा आढावा व मार्गदर्शन सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी बोईसर एमआयडीसी परिसरात गुन्हे वॉच पेट्रोलिंग करीत असताना रात्री.०१.२० वा.चे सुमारास दि.२० रोजी कॅमलिननाका ते नवमी हॉटेल जाणारे काही इसम (१) राम सखाराम काकड वय १९ रा.मु. वांद्रे,पो.पिवळी ता.शहापूर जि.ठाणे (२) गुरुनाथ पांडुरंग झुगरे वय २० रा.मु.बोटोशी बेलपाडा ता.मोखाडा जि.पालघर (३) नितेश संजय मोडक वय २२रा.मु. वाघेची वाडी पो. झाप ता.जव्हार जि.पालघर या तीन इसमांना ताब्यात घेतले.
बोईसर दि.२७| प्रतिक मयेकर:- शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू असून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर बोईसर पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपये किंमतीच्या मोटारसायकली चोरणाऱ्या तीन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. पालघर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. संशयतांनी आजपर्यंत चोरलेल्या तब्बल ३८ मोटारसायकल पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
टोळीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक :संशयित आरोपी १) राम सखाराम काकड वय १९ रा.मु. वांद्रे,पो.पिवळी ता.शहापूर जि.ठाणे (२) गुरुनाथ पांडुरंग झुगरे वय २० रा.मु.बोटोशी बेलपाडा ता.मोखाडा जि.पालघर (३) नितेश संजय मोडक वय २२रा.मु. वाघेची वाडी पो. झाप ता.जव्हार जि.पालघर यांची कसून चौकशी केली असता त्यांचेकडील बॅगमध्ये धारदार कोयता,लोखंडी कटावणी,मिरची पूड,दोरी, कटर,स्क्रू डायव्हर या सारखे हत्यार जवळ बाळगताना पकडल्यानंतर मिळून आले.त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता बोईसर एमआयडीसी मधील फास्ट टेकइंजिनिअर्स प्रा.लि.प्लॉट नं.ए-२२ कंपनीचे मागील बाजूचे कंपाउंड भिंतीवरून आत प्रवेश करून कंपनीतील सीसीटीव्ही वायर कट करून वॉचमन यास दोरीने बांधून कंपनीतील तांब्याचे धातूचे साहित्य दरोडा टाकून चोरी करण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यांच्याविरोधात बोईसर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र ७१/२०२३ भादंविसक ३९९,४०२, सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
आरोपी यांची पोलीस कोठडी रिमांड घेवून अधिक तपास केला असता त्यांनी त्यांचे अन्य साथीदार आरोपींसह पालघर,ठाणे ग्रामीण,नाशिक ग्रामीण,मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरातून अनेक मोटार सायकली चोरी करून त्या जव्हार,शहापूर परिसरात विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने अटक आरोपींकडून चोरी केलेल्या एकूण-१९,६०,०००/- रुपये किंमतीच्या ३८ मोटारसायकली असा ऐकून किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान,पोलिसांनी तीन मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेऊन ही कारवाई केल्यानंतर संशयितांकडून हस्तगत केलेल्या मोटरसायकली या एखादं वाहन बाजार भरवता येईल एवढ्या आहेत.पोलिसांनी जप्त केलेल्या मोटरसायकली पोलीस ठाण्यात आणून ठेवल्यानंतर पोलीस ठाण्याला जणू वाहन बाजाराचे स्वरूपच प्राप्त झाले होते.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरशाट,पोलीस उपअधीक्षक (गृह) अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल विभुते,यांच्या मार्गदर्शना खाली पोउपनि/सागर पाटील,पोउनि/भरतेश हारुगिरे,पोहवा/दीपक राऊत,पोहवा/कैलास पाटील,रणजीत पाटील, असिफ कलायगार, सुरेश पाटील,पोहवा/दिनेश गायकवाड,पोहवा/कपिल नेमाडे,पोहवा/नरेंद्र पाटील,पोहवा/हिरामण खोटरे,पोहवा/संदीप सरदार, पोशि/नरेश घाटाळ सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा,पालघर यांनी केलेली आहे.