नालासोपारा.पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या अपघाताकडे गांभीर्यानं लक्ष देवून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, एन एच आय चे मुकुंद आतरडे, महामार्ग पोलीस उपायुक्त दहीकर, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे संभाजी पानपट्टे ,वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बनारसी तडका समोर पावसाळ्यात पाणी साठते, आता पुलाचे काम पूर्ण होत आहे.कच्चे दरबारचे बाजूचे नाला उंच झाला आहे त्यामुळेच खाडीला पाणी जात नाही. पावसाचे पाणी रस्त्यावर साठवून महामार्ग बंद पडतो.रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सर्व हॉटेल मालकांनी पावसाच्या पाण्याचा निचरा होणारे गटार,नाले बंद केले आहेत तसेच भराव टाकून उंच केले आहे त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही पावसाळ्यात पाणी हायवेवर तुंबते जैन शिकंजी हॉटेल वालटण ढाबा आर एम सी प्लांट मुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
जैन शिकंजी हॉटेल समोर नाला खोदणे.अंबिका पेट्रोल पंप समोर पाणी साठत असल्याने सदर ठिकाणचा नाला खोल बनवून पाण्याच्या निचरा होण्याकरिता गटर बनवणे.वॉल्टन हॉटेल समोर पाणी साठत असल्याने सदर ठिकाणी नाला बनवून साठलेले पाणी खाडीमध्ये सोडणे.
दुर्गा मंदिर व राधे काठियावाडी हॉटेल समोर पाणी साठुन वाहतूक कोंडी होते. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अपघात होऊन मृत्यूचे प्रमाण जास्त आहे हिट अँड रन केस होतात. त्यासाठी कॅमेरे बसवले पाहिजेत. सूचना बोर्ड अत्यंत अल्प प्रमाणात आहेत. राष्ट्रीय महामार्गावर एनएचएआयने ऑटोमॅटिक पेनल्टी सिस्टमचे कॅमेरे बसवले पाहिजेत ज्यामध्ये वेगाने वाहने चालवणाऱ्या वे तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यामुळे वाहनचालकांना दहशत निर्माण होऊन ते वेगाने वाहन चालवणार नाहीत व पालघर जिल्ह्यातील अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल अशा प्रकारे कॅमेरे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर, मुंबई नाशिक महामार्ग व औरंगाबाद येथे बसवलेले आहेत त्या धर्तीवर मुंबई अहमदाबाद महामार्गावर बसवण्याची
तत्काळ मागणी केली आहे.
तसेच 40 टन वजन उचलण्याची क्षमता असलेले क्रेन, ५ ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड ची गाडी त्वरित मागवावी असे आदेश राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांना दिले.