Palghar Nargrik

Breaking news

मध्य प्रदेशात मोठा अपघात, पुलावर बस कोसळून 15 जण ठार तर 25 जखमी…….

मध्य प्रदेशात बसला मोठा अपघात झाला. खरगोनमध्ये पुलावरून बस कोसळून 15 जण ठार तर 25 जखमी झालेत. मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. खरगोनहून इंदूरला जाणारी बस पुलावर खाली कोसळली. या 50 हून अधिक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, या अपघातात 15 ठार आणि 25 जण जखमी झालेत.

खरगोन बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 25,000 रुपये तत्काळ आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली.

दुसऱ्या एका अपघातात बसमधील 7 जखमी
महाराष्ट्रात झालेल्या रस्ता अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. – मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. कोळसा वाहतूक करणाऱ्या डंपरची एसटी बसला जोरदार धडक बसली. बसमधील सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर महाडच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महाड जवळ नातेखिंड येथे हा अपघात झाला आहे. मुंबईहून महाबळेश्वर येथे जाणाऱ्या बसला डंपरची इतकी भीषण आहे की बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.

Leave a Comment