Palghar Nargrik

Breaking news

बोईसरमधील रासायनिक कंपनीला आग; तीन जखमी….

 

बोईसर-तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर w87 मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली.ही आग इतकी भीषण आहे की आगीच्या धुराचे लोट आकाशात सगळीकडे पसरू लागले आहेत.|

बोईसर, ०३ जुलै: बोईसर एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत.या आगीत तीन कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे.या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्नीशमन दल दाखल झाले आहेत. ही आग इतकी भीषण आहे की आगीच्या धुराचे लोट आकाशात सगळीकडे पसरू लागले आहेत.या कारखान्यात जेव्हा मोठा ब्लास्ट झाला तेव्हा जवळपास सहा ते सात किलोमीटर परिसरामध्ये हादरे बसल्याची माहिती मिळत आहे. आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागताच आजूबाजूचे लोक घाबरून गेले आहेत.

बोईसर एमआयडीसी मधील रवीना इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग लागली आहे.रवीना इंडस्ट्रीज केमिकल कंपनीमध्ये विविध प्रकारचे रासायनिक ड्रमची उलाढाल करण्याचे काम केले जात होते.अशी सूत्राकडून माहिती मिळत आहे. दरम्यान, आज रात्री नऊच्या सुमारास अचानक या गोडाऊनला आग लागली. या केमिकल कारखान्यांमध्ये टँकर शिरल्यानंतर एका सिक्युरिटी गार्डने स्टो पेटवल्यानं भडका उडून केमिकल टँकरला आग लागून भयंकर स्पोट झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यामुळे काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले.

फुरखान युनिस खान (वय २७, रा. हरदावली, तालुका बबेरु जिल्हा बांदा, उत्तर प्रदेश सध्या राहणार सत्तर बंगला midc बोईसर), अस्पाक नजर मोहम्मद शेख (वय ३५, रा. सत्तर बंगला बोईसर मूळ रा. दलपुतपूर तालुका जिल्हा बलरामपूर उत्तर प्रदेश), काळुदार संतराम वर्मा (वय ५०) राहणार सत्तर बंगला बोईसर अशी आगीत जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

बोईसर एमआयडीसीचे अग्निशमन यंत्रणा समोरच असल्याने अग्निशमन दलाच्या जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. या जवानांनी ही आग तत्काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कारखान्यात अत्यंत ज्वलनशील रसायन असल्यामुळे ही आग क्षणार्धात वाढली आणि संपूर्ण कंपनी या आगीच्या विळख्यात सापडली. यामुळे ही भीषण आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते.केमिकल टँकरला गळती झाल्यामुळं आग लागल्याची माहिती पालघरचे उपविभागीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली आहे.

 

Leave a Comment