Palghar Nargrik

Breaking news

सप्तशृंगी गडावर जातांना बस ४०० फूट खोल दरीत कोसळली ; २० प्रवाशी ???

सप्तशृंगी गड : सप्तशृंगी गड घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला असून ही बस थेट ४०० फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात असून १५ ते २० जण जखमी झाल्याचे समजते आहे.सविस्तर वृत्त असे की ही बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेने जात असताना घाटातील गणपती टप्प्यावरुन नियंत्रण सुटले. यानंतर बस थेट ४०० फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये २० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी ८.३० वाजता ही बस सप्तशृंगी गडाकडे आली होती. त्यानंतर रात्री ती सप्तशृंगी गडावर मुक्कामी थांबली होती. सकाळी पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असतानाच या बसला भीषण अपघात झाला.

प्रतिक्रिया – सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील १८ प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉइंटजवळ वणी गड उतरत असतां हा अपघात झाला आहे. अशी प्रार्थमीक माहिती आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना.

दादाजी भुसे, पालकमंत्री, नाशिक

Leave a Comment