छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवर (CSMT) आणखी एका सबवेची मंजूरी देण्यात आली आहे. हा सबवे सीएसएमटी रेल्वे स्टेशन आणि मेट्रो-3 कॉरिडोरच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या मध्ये बांधण्यात येणार आहे. या सबवेची लांबी 365 मीटर इतकी आहे. विशेष म्हणजे, या सबवेमुळं सीएसएमची मेट्रो स्टेशन आणि लोकल प्रावाशांना आरामात स्टेशनपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (Mumbai Metro) या सबवेचे निर्माण केले जाणार आहे.
एमएमआरसीनुसार, सीएसएमटीवर बांधण्यात येणार हा सबवे मुंबईतील सर्वात हायटेक असणार आहे. याच प्रवाशांसाठी लिफ्ट, एक्सेलेटर, ट्रेवलेटर, रिफ्रेशमेंट, टॉयलेट यासारख्या सुविधा असतील. सबवेसाठी इंजिनीअरिंग आणि टेक्निकल फिजिबिलीटीवर अधिक काम करण्यात येणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी या सबवेचा बांधकाम खर्च राज्य सरकार व रेल्वेकडून करण्यात येणार आहे.
सीएसएमटी रेल्वे स्टेशनमधून रोज जवळपास 16 लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रो ३ कॉरिडोरवर सीएसएमटी मेट्रो स्टेशन 2025पर्यंत रोज 2 लाख प्रावासी प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एमएमआरसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार, सबवेच्या बांधकामाबाबत रेल्वेसोबत चर्चा करण्यात येत आहे. सर्व आवश्यक कागदपत्र तयार झाल्यानंतर सबवेचे काम सुरु करण्यात येतील. भूमिगत मेट्रो लाइनचे निर्माणकार्य 84 टक्के पूर्ण झाले आहे. तसंच, डिसेंबर 2023मध्ये आरे आणि बीकेसीतून कप परेडपर्यंत जून 2004पर्यंत सेवा सुरु करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत सीएसएमटी रेल्वे स्थानकात एक सबवे आहे. बीएमसी आणि आझाद मैदानून या सबवे जातो. मात्र या सबवेवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते. मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर इथून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. पश्चिम उपनगरात राहणाऱ्या प्रवाशांना चर्चगेट रेल्वे स्थानकात जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकातूनच जातात.
सीएसएमटी मेट्रो स्टेशन पूर्णपणे तयार झाल्यानंतर उपनगरात राहणारे प्रवासी पश्चिम रेल्वेऐवजी मेट्रोने प्रवास करण्यास प्राधान्य देतील. मेट्रो 3 कॉरिडॉर इतर मेट्रो मार्गांशी देखील जोडला जात आहे. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी मेट्रोकडे वळण्याची शक्यता आहे. भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने जागतिक वारसा असलेल्या सीएसएमटी येथे दुसरा भुयारी मार्ग बांधण्यास परवानगी दिली आहे.