Palghar Nargrik

Breaking news

जिल्हा परिषदेच्या विविध पदाची सरळसेवेने भरती . -जिल्हाधिकारी गोविंद बोडके

पालघर दि. 04 : (जिमाका) जिल्हा परिषदेच्या विविध पदाच्या 991 जागांसाठी सरळसेवेने भरती करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी दि. 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले.

. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी जिल्हा परिषदेच्या पद भरती संदर्भात माहिती दिली.
.
. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपस्थित होते.

. जिल्हा परिषद पालघरच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. 01/2023 दिनांक 05/08/2023 अन्वये प्रसिध्द करण्यात येत आहे.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद, पालघर च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. जाहिरात क्र. 01/2023 नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 05/08/2023 पासून ते दिनांक 25/08/2023 रोजी पर्यत आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या लिंकवर दिनांक 25/08/2023 रोजीचे रात्री 23:59 वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद पालघर च्या https://www.zppalghar.gov.in या लिंकवर उपलब्ध आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

Leave a Comment