आज जागतिक आदिवासी दिन मनोर येथे साजरा करण्यात आला मनोर चे पोलीस निरीक्षक श्री सतीश शिवरकर यांचे हस्ते नारळ वाढऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली, गावदेवी,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चौकाला हार अर्पण करण्यात आले.इर्सालवाडी येथील मृतात्म्याना श्रध्दांजली वाहण्यात आली त्यानंतर आदिवासी दिनाच्या शिवरकर साहेब,तानाजी घोलप,कुमावत सर,प्रवीण संखे यांनी शुभेछ्या दिल्या आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन किरकिरा सर यांनी केले आभार प्रदर्शन मंगेश गोंड यांनी केले.या कार्यक्रमाची व्यवस्था आदिवासी एकता मित्र मंडळाचे योगेश भुयाळ,दामोदर कासट,किसन भुयाळ व सर्व युवा टीम ने केली