रविवारी छानसा पाऊस, कमाल वातावरण आणि एकंदरच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तुम्हीही मुंबईत भटकंतीसाठी येण्याचा बेत आखताय? घरात आलेल्या पाहुण्यांना मुंबई आणि त्याहूनही मुंबईची लोकल दाखवायचीये? असं असेल तर सर्वप्रथम ही माहिती वाचून घ्या. कारण, या रविवारीसुद्धा मुंबई लोकलवर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. मध्य रेल्वेच्या नाहूर आणि मुलुंड स्थानकांदरम्यान गर्डर टाकण्यासाठी शनिवारपासूनच हा ब्लॉक घेण्याक येणार आहे. शनिवार- रविवार या दरम्यानच्या काळाच रेल्वेच्या सहा ट्रॅकवरील सेवा बंद राहतील. परिमामी सर्व लोकल ब्लॉक काळापुरचा रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकचा परिणाम लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवरही होणार आहे.
ब्लॉक कालावधी आणि बरंच काही…
रेल्वेचा पहिला ब्लॉक शनिवारी रात्री 1 वाजून 20 मिनिटांपासून सुरु होणार असून, तो रविवारी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत सुरु राहील. मुलुंड आणि विक्रोळी दरम्यान अप आणि डाऊन जलद आणि धीम्या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर हा ब्लॉक घेतला जाईल. ब्लॉकच्या आधी सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेने शेवटची लोकल रात्री 12 वाजून 24 मिनिटांनी निघेल. कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने शेवटची लोकल निर्धारित वेळएत निघेल.
ठाण्यातही हीच परिस्थिती
काही तांत्रित कामांसाठी रेल्वे विभाग ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गासह सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक घेईल. परुणामी ब्लॉकदरम्यान ठाणे ते वाशी दरम्यान धावणाऱ्या काही लोकल रद्द असतील.
उपनगरीय रेल्वेमार्गावर काय परिस्थिती?
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईलय ज्यामुळं उपनगरीय रेल्वेनं अर्थात हार्बर मार्गानं प्रवास करणाऱ्यांनी रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करावा. पश्चिम रेल्वेवर मात्र ब्लॉक कालावधी कमी असून शनिवारी रात्रीच्याच वेळी हा ब्लॉक घेण्यात येईल.
शनिवारी रात्री 12 वाजून 40 मिनिटांपासून ते रविवारी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल विरार/वसई रोड ते बोरिवलीदरम्यान अप जलद मार्गावर आणि गोरेगाव ते वसई रोड/विरार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील.