नुकत्याच बोईसर विधानसभेचे अध्यक्ष नरेश धोडी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा पुसण्याकरिता सपाटून मार खाणाऱ्या जिजाऊ संस्थाचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.
दि.२२ पालघर| नुकत्याच बोईसर विधानसभेचे अध्यक्ष नरेश धोडी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा पुसण्याकरिता सपाटून मार खाणाऱ्या जिजाऊ संस्थाचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.काही मोजक्याच पत्रकारांना चक्क पैसे वाटण्यात आल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुमारे मोजक्या पत्रकारांना सहा हजार रुपये भेटीदाखल वाटण्यासाठी पक्षाच्या अब्रू चव्हाट्यावर येऊ नये यासाठी हे पैसे देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
जिजाऊ सामाजिक संस्थे कडून तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या काळात पक्षाचा प्रचार चांगला धुमधडाक्यात करण्यासाठी तसेच पत्रकारांना विविध प्रकारची माहिती पुरविण्यासाठी पक्षातर्फे ‘माध्यम कक्ष’ स्थापन करण्यात आला होता.
या कक्षाची जबाबदारी पालघर जिल्हा अध्यक्ष महेंद्र ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली होती.एका वहीवर नावे टाकून पत्रकारांना कोणत्या पेपर साठी काम करतो यांची यादी तयार करण्यात आली.त्यामध्ये काही मोजक्याच पत्रकारांनी पैसे घेतल्याचं दिसून आले.२२ ऑगस्ट रोजी जिजाऊ सामाजिक संस्थेला लागलेले काळे डाग सफेद करण्यासाठी इतर बाबींची चर्चा करण्यासाठी पत्रकार प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. तेथे पैसेही देऊ केले. मात्र काही प्रतिनिधीने ही पैशाची भेट नाकारली.