Palghar Nargrik

Breaking news

दुर्घटना रोखण्यासाठी , संपूर्ण जिल्हा पोलिस दल एकटवला….. स्वागतार्ह ……

झालेल्या मीटिंग मध्ये आदरणीय जिल्हा एस पी , श्री बाळासाहेब पाटील साहेबांनी उत्तम मार्गदर्शन केले. जमलेले महामार्ग अधिकारी. ठेकेदार कं चे इंजिनिअर , वाहतूक शाखा अधिकारी स्थानिक पोलीस स्टेशन प्रभारी उपस्थित होते.

अनधिकृत कट बंद केल्यानंतर काही प्रमाणात , फैटल एक्सीडेन्ट होउन , प्राणहानी चे प्रमाण कमी झाले असले तरी बर्याच ठिकाणी अद्यावत उपाययोजना अजून स्वप्न रूपात आहेत.

नशाकरुन वाहने चालवणे, निद्राधीन असताना वाहने चालवणे , अतिवेगाने चालवणे , ओव्हरलोड, रॉंगसाईड ने ओव्हरटेक , ओवरलोड अशी बरीच कारणे अपघातास कारणीभूत आहेत हे सर्वादीत आहे आणि पोलिस प्रशासन त्यावर नियंत्रण मिळवण्यात क्रियाशील आहे.

महामार्गावरील तृटीबाबत या अगोदरही झालेल्या अनेक मीटिंग मध्ये , मा. खासदार साहेबांनी लेखी दिल्यानंतर हि ,मस्तवाल प्राधिकरण अधिकारी लक्ष देत नाहीत , उदा. रूगृणवाहिका संख्या वाढवणे …

ठेकेदार सोबत केलेल्या करारानुसार जी संख्या नमूद आहे त्या पलीकडे आम्ही उपलब्ध करण्यास असमर्थ आहोत . हे उत्तर त्यांनी सर्व बाबतीत लागू असे गृहित धरलेले आहे .

या साठी केंद्र सरकारने CEG अश्या स्वतंत्र अभियांत्रिकी कंपनी चा हि ठेकेदार नेमला आहे , परंतु क्वचितच ते मीटिंग ठिकाणी हजर असतात.

साधारण लोकांना दिसणार्या समस्यांवर हे इंजिनिअर जाणून बुजून डोळेझाक करतात , वेळीच रिपोर्ट करीत नाही , उलट ठेकेदाराला फायदा कसा होईल या साठी चे खोटे रिपोर्ट प्राधिकरण कडे सादर करतांना दिसते.

वीस-तीस वर्षांपूर्वी पासून हयात असणारे ” दुर्घटना प्रवण क्षेत्र” आजही लाखों खर्च करून जसं च्या तसं आहेत.

सायरस मिस्त्री दुर्घटना स्थळ अजून ही दुर्लक्षीत आहे , मेनढवण, चारोटी नाका, आंबोली , विक्रमगड फाटा असे अनेक स्थळ रक्ताने लाल झाले आहेत .

 

अश्या मस्तवाल अधिकार्यांवर गुन्हे दाखल केल्यास हमखास सुधारणा दिसून येईल ,

कुठे वेग नियंत्रक बोर्ड लावावे, दुर्घटना प्रवण क्षेत्र फलक लावावेत , रिफ्लेक्टर आदी सुचक बोर्ड लावले नाहीत म्हणून वाहन चालक गफलतीत राहून वाहन निर्धास्तपणे चालवल्याने दुर्घटना घडली , तर चालका एव्हढीच हि यंत्रणा पण दोषी नाही का ….???

आणि अश्या सुचनां देण्यासाठी पोलिस प्रशासनाने वारंवार मीटिंग घेउन हे सुधरणा करणार नसतील तर दुसरा पर्याय अमलात आणावा.

अमुक अमुक ठिकाणी वारंवार दुर्घटना घडून आजवर शेकडो निरपराध लोकांनीं प्राण गमावले, अपंगत्व आलं , परीवार उध्वस्त झाले , आणि प्राधिकरण अधिकारी हतबल….. खुर्ची खाली करा… निदान मृतात्मे सुखावतील , सक्षम अधिकारी काहीतरी उपाय करावे लागतील अशी बांधीलकी तरी जपेल.हा , टेक्निकल अत्याचार आता थांबलाच पाहिजे . अन्यथा …..

” थू आहे तुमच्या इंजीनियरिंग डिग्री वर”

 

Leave a Comment