Palghar Nargrik

Breaking news

रॅली मध्ये आपले कर्तव्य सोडून,पत्रकारावर पोलिसाची दादागिरी

पालघर | प्रतिनिधी

पालघर लोकसभे साठी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असताना,भाजपा उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांची अर्ज भरायची रॅली निघालेली असताना त्या गर्दीमध्ये आपले कर्त्यव्य बजावणाऱ्या पत्रकारांवर अरेरावीची भाषा करत,पत्रकारिता आपली मोबाईल मधून शुटींग करत असताना,मोटरसायकलची चावी काढून घेण्यात आली होती.त्या गर्दीच्या वेळी दोन दोन रुग्णवाहिका या रस्त्यावर अडकल्या होत्या,त्यातील एक पाठी मागून येतेय म्हणून होर्न का वाजवतो म्हणून,चिडत गाडी बाजूला घे तुला बघतो असे म्हणून चालू गाडीची भर गर्दीत चावी काढून घेतली.प्रत्यक्ष आपण कुठल्या कर्तव्यावर आहोत आणि काय करत आहोत,पोलिसी वर्दी अंगावर असल्यने आपण काहीही करू शकतो का…? ह्याचे ज्ञान पोलीस अधीक्षकांनी आपल्या मुजोर कर्मचाऱ्याला द्यायला पाहिजे.

या वेळी रॅली मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर उल्लद बाजी सुरु होती,आणि फोगिंग मशीन ने लाल कागदाच्या चिंद्या उडवत असल्याने आणि उन्हा मुळे पोलीस कर्मचारीही वैतागून गेले होते.त्यामुळे त्याचा त्राण पत्रकारांवर निघाला आहे. 

पोलिसांवर कामाचा त्राण आहे,हे पालघर नागरिक नेहमीच आपल्या बातम्यांच्या आधारे अधोरेखित करीत आली आहे.आम्ही पोलिसांना नेहमी न्यायाच्या बाजूने उभे राहिलेले पाहिले आहे.पण तुमच्या सारखेच आमचे पत्रकार सुद्धा कर्तव्य करत आहेत.जर मुजोर पोलीस कर्मचारी पत्रकारांशी असे वागत असतील तर सामन्य जनतेशी किती मुजोरीने वागत असतील.

–जावेद लुलानिया ,संपादक पालघर नागरिक,

Leave a Comment