Palghar Nargrik

Breaking news

अरविंद गणपत सावंत यांच्या शिवडी येथील प्रचारफेरीस नागरिकांचा उदंड प्रतिसाद….

लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने प्रचारफेरीस सुरुवात झाली. चिवडा गल्ली, डॉ. बी. ए. रोड, दत्ताराम लाड, ग. द. आंबेकर मार्ग, बीइएसटी कॉलनी , डॉ. ना. ल. परळकर मार्गावर स्थित सोसायटी, चाळीमधील स्थानिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले, छोट्यामोठ्या व्यावसायिकांनी पाठिंबा दर्शविला महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. नवमतदारांचा प्रतिसाद उत्साही होता. शिवडी विधानसभे मधील विविध गणेशोत्सव मंडळांच्या सदस्यांनी जंगी स्वागत केले.
#दक्षिणमुंबई च ठरलंय, अब की बार भाजप तडीपार!


प्रचारफेरीत काँग्रेस पक्षाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष श्री. रवि बावकर, सौ. स्मिता चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. बबन कनावजे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार श्री. अजय चौधरी, माजी आमदार श्री.

दगडूदादा सकपाळ, विभागप्रमुख श्री. आशिष चेंबुरकर, उपविभागप्रमुख श्री. गजानन चव्हाण, उपविभागप्रमुख श्री. पराग चव्हाण, माजी नगरसेवक श्री. दत्ता पोंगडे, माजी नगरसेविका श्रीमती सिंधुताई मसुरकर, माजी नगरसेवक श्री. अनिल कोकीळ, माजी नगरसेवक श्री. सचिन पडवळ, माजी नगरसेविका सौ. वैभवी चव्हाण, महिला विभाग संघटक सौ. लता रहाटे, महिला उपसंघटक सौ. श्वेता राणे ,महिला उपसंघटक सौ. रुपाली चांदे , महिला सहविभाग संघटक सौ. दिव्या घाडीगावकर आणि दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक श्री. सुधीर साळवी व श्री. सत्यवान उभे तसेच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे स्थानिक आजी-माजी पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
#ArvindSawant #दक्षिणमुंबई #LokSabhaElections2024 #प्रचारफेरी

Leave a Comment