पालघर | मयूर ठाकूर
३ मे रोजी निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपा कडून रस्त्यावरील वाहतूक अडवून निवडणूक अर्ज भरण्यासाठी रॅली काढण्यात आली होती.फोगिंग मशीन मधून लाल कागदाच्या चिंद्या सर्वत्र उडविण्यात येत होत्या.त्या चिंद्याचा कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि जिल्हाधिकारी कार्यालय आवारात झाला होता.
त्या चिंद्याचा कचरा कोण साफ करणार हा प्रश्न निर्माण झाला असून अजूनही त्या चिंद्या रस्त्यावर सर्वत्र दिसून येत असून स्वच्छ भारत ची हाक एकीकडे आणि असा कचरा दुसरी कडे अशी भाजपची परिस्थिती झाली आहे.त्यातच गोठणपुरच्या मैदानावर स्थलांतरित आदिवासी बांधवांच्या झोपड्या झाकण्यासाठी परडे लावण्यात आले होते.
त्या मुळे भाजपा चा विकासाचा खरा चेहरा सर्वान समोर आला आहे.त्यातच कुठल्या तरी भोंदू बाबाबे भाजप उमेदवाराला सांगितले म्हणून आपली पक्षाची विकासकामे दाखवण्या ऐवजी उमेदवार जीवदानी देवीचा आशीर्वाद घ्यायला पोहोचले.आणि हे स्वतः उमेदवार डॉक्टर आहेत.त्यात त्यांच्या बरोबर भाजप चे पालक मंत्री सुद्धा होते.जिल्हयात कुठलेही काम असो त्यांना कोणी आवाज द्यायचा नसतो…? पण लोकसभा भाजप जिंकणार..? त्या साठी प्रचारात ते पुढे आहेत,त्यांना आदिवासी पाड्यावरील पाणी टंचाई दिसत नाही.पण आता प्रचारासाठी आणि तेव्हा कार्यकर्त्यांच्या हॉटेल च्या उद्घाटना साठी वेळ मिळतो.असे आहेत हे भाजप चे पालक मंत्री…?
तसे तर पालघर लोकसभेला महायुतीने भाजपच्या डॉक्टर हेमंत सावरा यांच्या सारखा उमेदवार देऊन एक प्रकारे सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. पण डॉ.हेमंत सावरान सारखा उमेदवार इतर उमेदवारांना तगडी लढत देऊ शकतील असे वाटतं नाही.त्या मुळे फक्त बहुजन विकास आघाडीचेच एकमेव उमेदवार जे आपल्या कामाच्या जोरावर निवडून येऊ शकतात ते म्हणजे बोईसर चे विद्यमान आमदार राजेश पाटील…! राजेश पाटील यांना आता कोणाचेच तगडे आवाहन उरलेले नसून, महायुती आणि महाआघाडीच्या लढतीत बहुजन विकास आघाडी बाजी मारणार हे नक्की….?
उबठा गटाची उमेदवार आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष काळात काही कामाची चुणूक दाखवू शकली नाही.त्या फक्त नामधारी म्हणून होत्या.पण तेच बोईसर चे विद्यमान आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार हि निवडणूक आपल्या कामाच्या जोरावर लढताना दिसत आहेत.
त्यात विद्यमान खासदार गाविताना पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारने हे अत्यंत धक्कादायक आणि त्यांच्या साठी दुःखद निर्णय होता, अशा भावना पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केल्या आहेत.मात्र कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करुन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करणार, असा विश्वासही गावितांनी बोलून दाखवला आहे.पण नाराज कार्यकर्ते खरच महायुतीतील भाजप उमेदवाराला मदत करतील…?
माजी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव हेमंत सावरा यांना पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत असल्याचे भाजपने गुरुवारी रात्री जाहीर केले. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवस, किंबहुना जेमतेम काही तास आधी भाजपने तिकीट जाहीर केले. त्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना मोठा धक्का मानला जात आहे. गावितांना दुःख झाले असले, तरी कुठलाही निर्णय घेण्यासाठी पक्षाने त्यांच्याकडे अवधीच दिला नाही.
त्यात विशेष म्हणजे राजेंद्र गावित हे पूर्वी भाजपवासी होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीत लढले. मात्र पालघरची जागा शिवसेनेला सुटल्याने गावितांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढली, ते विजयीही झाले. राजकीय दृष्ट्या ही एक प्रकारची अॅडजस्टमेंट मानली जात होती. यंदा हा मतदारसंघ परत मिळवण्यासाठी भाजप आग्रही होतं. परंतु गावितांना पुन्हा संधी मिळणं फिक्स मानलं जात असल्यामुळे त्यांची घरवापसी होऊन ते भाजपच्या तिकिटावर आता रिंगणात उतरतील, अशी अटकळ बांधली जात असतानाच महायुतीत भाकरी फिरवण्यात आली.
तसेच भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष ह्यांनी पालघर-बोईसर चा युपी-बिहार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कालपासून होत आहे.भाजपा आणि काही संघटना पालघर या आदिवासी जिल्ह्यातील बोईसर येथे सर्कस ग्राउंड येथे लावणी डान्सर गौतमी पाटील चा कार्यक्रम ठेवला आहे.पालघर जिल्ह्याची हि संस्कृती नसून, गौतमीच्या कार्यक्रमाची आणि तिच्या अश्लील नृत्याची चांगलीच क्रेझ सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये आहे. नृत्यांगना गौतमी पाटील ही वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे. तिच्या लावणी कार्यक्रमांमध्ये नेहमीच गोंधळ होतो.
तसेच ह्या कार्यक्रमाचे आयोजक हे सुद्धा पालघर -बोईसर मध्ये युपी बिहार सारखी दबंगाई आणू पाहत आहेत.प्रशांत संखे यांनी आधी टीमा रुग्णालयात तोडफोड केली होती.
तसेच जाहिरात फलकावरील इतर साथीदार हे सुद्धा बोईसर मध्ये कोयत्याने एकावर हल्ला करण्या प्रकरणी आरोपी आहेत.बोईसर महोत्सव असला तर सर्व पक्षीय हवा,पण हा फक्त भाजपा नेत्यांच्याच आहे असे जाहिरात फलकावरून दिसते.