पालघर | मयूर ठाकूर
पालघर लोकसभेवर जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे.त्या मुळे लोकसभेची निवडणूक अजून रंगतदार झाली आहे.निलेश सांबरेनी ज्या पद्धतीने पालघर लोकसभे साठी उमेदवार घोषित केला होता,त्या पद्धतीने जिजाऊ आपला उमेदवार निवडून आणायला मोठ्याप्रमाणात जोर लावणार होते.आणि जीजाऊ ची जिल्ह्यातील बांधणी पाहता जिल्हयात पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकीत जिजाऊ संघटनेच्या शिवाय पर्याय नाही…? पण आज जिजाऊच्या निलेश सांबरेनी त्यांचा उमेदवार कल्पेश भावर आणि वासंती झोप यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याने आता ते कोणाला पाठींबा देणार..? बहुतेक आता जिजाऊ आता बहुजन विकास आघाडीला पाठींबा देणार असे कळत आहे.पण जर बहुजन विकास आघाडीची सत्ता पालघर लोकसभेवर आली तर जसे आता आमदार असताना काही पदाधिकारी आमदार फंडातील कामे दादागिरी करून स्वतः कंत्राट घेऊन निकृष्ट दर्जाची कामे करत आहेत.जसे डांबरी रस्त्यावर गवत उगवणे याच्या सारखे रस्ते बनवणे.स्वतंत्र दिनी बहुजन विकास आघाडीची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीवर काम करण्यासाठी बाल कामगार लावणे.अशी दादागिरी सारखी सत्ता पालघर वर येऊ शकते.तसेच वसई विरार प्रमाणे इमारत बांधकाम साठी परवानगी साठी विरार येथे जावे लागणार आहे.तसेच आता बहुजन विकास आघाडीची शिट्टी कशी वाजणार हे पहावे लागेल…?
आता निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार, त्यांचा पक्ष आणि चिन्ह पुढीलप्रमाणे : भरत सामजी वनगा, बहुजन समाज पार्टी, चिन्ह (हत्ती), भारती भरत कामडी, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), चिन्ह (मशाल), डॉ. हेमंत विष्णू सवरा, भारतीय जनता पार्टी, चिन्ह (कमळ), राजेश रघुनाथ पाटील, बहुजन विकास आघाडी, चिन्ह (शिट्टी), मोहन बारकू गुहे, भारत आदिवासी पार्टी, चिन्ह (हॉकी आणि बॉल), कॉम्रेड राहुल मेढा, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (रेड फ्लॅग), चिन्ह (बॅट), विजया राजकुमार म्हात्रे, वंचित बहुजन आघाडी, चिन्ह (गॅस सिलेंडर), अमर किसन कवळे, अपक्ष, चिन्ह (बॅटरी टॉर्च), दिनकर दत्तात्रय वाढाण, अपक्ष, चिन्ह, (विहीर), मीना किशोर भड, अपक्ष, चिन्ह, (खाट).असे उमेदवार रिंगणात आहेत.