Palghar Nargrik

Breaking news

जो काम करणार त्यालाच पाठिंबा ; भूमिपुत्र संघटनेचा निर्धार

वाडा | वसिम शेख

भूमिपुत्र संघटनेचा वाडा येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा अध्यक्ष भास्कर दळवी यांच्या अध्यक्षते खाली पार पडला. या मेळाव्याला जिल्हा अध्यक्ष जावेद लुलानिया, सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सर्वानुमते लोकसभेला जो उमेदवार आपल्याला आपल्या समस्या सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देईन आणि निवडून आल्यावर मदत करेन अश्याच उमेदवारास पाठिंबा द्यायचा असे ठरविण्यात आले. तसेच संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे. असे जिल्हा अध्यक्ष जावेद लुलानिया यांनी आपल्या भाषणात सांगितले. आता पर्यंत सर्वांनी कामे न करता फक्त मत मागितली, पण आता आमच्या समस्या ऐकूण घेऊन त्यावर उपाय करेन अश्याचा उमेदवाराला संघटना पाठिंबा देणार आहे. असा निर्धार संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आला.

Leave a Comment