पालघर | प्रतिनिधी
पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपले भाग्य आजमवण्या साठी भलेही दहा उमेदवार मैदानात उतरले असले तरी सध्याच्या परिस्थिती वरून खरी लढत हि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि महाविकास आघाडीच्या शिवसेना उबठा गटाच्या भारती कामडी यांच्यात दिसत आहे.त्यात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी तलासरी तालुक्यातील दुर्गम अश्या नांगर पाडा विभागात ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन अनेक वर्षापासूनच रखडलेल्या कामे , गरजा विषयी गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली तसेच विवध प्रश्न व समस्या मांडल्या.आमदार राजेश पाटील यांनी समस्या जाणून घेतल्या आणि समस्या सोडविन्याचे आश्र्वाशित केले.यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे पालघर विधानसभा अध्यक्ष सुरेश पाडवी, पालघर लोकसभा समन्वयक अंकुश कोथमिरे, प्रवक्ते रणधीर कांबळे,पालघर जिल्हा उपाध्यक्ष जमनादास राजड,तलासरी अध्यक्ष राजेश इरीम,वेवजी ग्रामपंचायत विभागातील भारत भाई आणि विभागातील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.त्या नंतर त्यांनी वाढवण गावाला भेट दिली ,आणि तिथल्या समस्या जाणून घेतल्या,गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना त्यांनी होऊ घातलेले विनाशकारी वाढवण बंदर आणि यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांचा रोष गावकऱ्यांच्या डोळ्यात दिसत होता.
परंतु हितेंद्र ठाकूर यांनी वाढवण बंदर विरोधी भूमिका सुरुवाती पासूनच घेतली होती,आणि आज उपस्थित गावकऱ्यांना माझी सुद्धा वाढवण विरोधी भूमिका कायम राहील असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी दिले.
तसेच चिंचणी येथे बहुजन विकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन या वेळी करण्यात आले.यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे पालघर विधानसभा अध्यक्ष सुरेश पाडवी, बहुजन विकास आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सारस जाधव,अंकुश दादा कोथमिरे,रणधीर कांबळे, वाढवण गावचे किरण पाटील यांच्या सह बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
इतर उमेदवारांना कोणालाच विधीमंडळाच्या कार्याचा अनुभव नसल्याने फक्त राजेश पाटील यांनाच हा अनुभव असून इतर उमेदवार हे नवखे आहेत.तसेच राजेश पाटील यांनी बोईसर मतदार संघात केलेल्या भरीव कामगिरी मुळे ते निवडून येण्याची शक्यता जास्त प्रमाणात वर्तविण्यात येत आहे.तसेच बहुजन विकास आघाडीचा प्रचार हा गावोगावी आणि खेडे पाड्यात सुरु असून,प्रचारात बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि उबाठाच्या भारती कामडी आघाडी वर दिसत आहेत.