पालघर | मयूर ठाकूर
पालघर जिल्हयात दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्याचा तडाखा मोठ्याप्रमाणात बसला असून अनेकांच्या घरावरील पत्रे वाऱ्याने उडून गेले आहेत.त्या वेळी हि बातमी म्हणून न पाहता तीन वर्ष्या पूर्वी २०२१ साली हि असेच वादळ जिल्हयात आले होते,त्या वेळी उद्धव ठाकरे सरकार राज्यात होते.राज्यात विरोधी पक्षात भाजपा होते.
आता भाजप सत्तेत आहे.त्या मुळे तेव्हा सारखी जास्त शो शायनिंग न करता भाजपच्या पालक मंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना लवकरात लवकर पंच नामे पूर्ण करून नुकसानभरपाई द्यावी असे आदेश दिलेत.पण ते स्वतः हे विसरलेत कि निवडणूक आचारसंहिता सुरु असून जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकारी कर्मचारी यांचे हात त्या मुळे बांधलेले आहेत.ते नागरिकांना मदत कशी पोहोचवणार….?
आधीही जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली सत्तेत असलेले सरकार कमी पडते हे दाखवण्याच्या साठी भिक मागून विरोधी पक्षाने शो शायनिंग केली होती.
या वेळी निवडणूक आचारसंहिता मुळे तशी शो शायनिंग होणार नाही.हे सर्वच पक्ष जाणून आहेत.
म्हणून रोजच्या रोज पाऊस वादळ सुरु असताना मदतीसाठी कोणताही पक्ष कार्यकर्ता आणि पक्ष पदाधिकारी समोर येत नाही.