–अनधिकृत बांधकामावर चालवणार बुलडोझर
–पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त अनधिकृत बांधकामे योगिच्या प्रदेशातील मतदारांची
पालघर | मयूर ठाकूर
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे काल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपच्या हेमंत सावरा यांच्या प्रचाराला येऊन सभा घेऊन गेले.या सभेत त्यांनी पालघर जिल्हयात असलेल्या अनधिकृत बांधकामे निष्काशित करणार असे सांगितले,हे त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना उद्देशून म्हंटले पण ते त्यांच्याच प्रांतातून महाराष्ट्रात आपली उपजीविके साठी आलेल्या आपल्याच लोकांना लागू होते,हे ते विसरले होते.
नालासोपारा,नायगाव,बोईसर,या भागात शासकीय किवा आदिवासींच्या जागेवर अनधिकृतपणे उभी असलेली बांधकामे हि त्यांच्याच उत्तर प्रदेश बिहार या राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या तडीपार माफियांची आहेत.ती त्यांनी परप्रांतीय गरीब कामगारांना विकून मोठे झाले आहेत.जर ती बांधकामे हितेंद्र ठाकूर निष्काशित करायला गेले तर याच परप्रांतीय गरीब कामगारांच्या डोक्यावर छत राहणार नाही.हितेंद्र अप्पा यांना या गरिबांची काळजी आहे.पण ज्या राज्यातून हे उपरे गरीब कामगार आपल्या पोटा पाण्यासाठी येतात.त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांची पडलेली नाही…?
एक तर आपल्या राज्यात रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही.आणि ज्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळाला आहे त्या ठिकाणीही जाऊन त्यांच्या रोजगार आणि छत राहू द्यायचे नाही.त्यांच्या सोबत दुसरे होते,डहाणू जनता बँकेचे माजी आरोपी,जे राजेंद्र गावितांना उमेदवारी द्यायला विरोध करतात,आणि जेव्हा गावित राज्यमंत्री होते.तेव्हा त्यांच्याच दरबारात स्वतःला वाचविण्यासाठी जाऊन हजेती लावतात.आता म्हणतात ना कि भाजपात जा आणि स्वच्छ होऊन या,त्या प्रमाणे ते दिल्लीच्या बाई च्या आशीर्वादाने स्वच्छच नाही झाले..? तर जिल्हाध्यक्ष सुद्धा झाले.आणि मराठीत एक म्हण आहे.सापाला कितीही दुध पाजा तो चावणारच..?त्या प्रमाणे,जिल्हाध्यक्ष हेही आहेत.दुसरे राहिले,उबठा उमेदवार ज्यांनी आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष काळात कामे फक्त काही मित्र असलेल्या कंत्राटदरांची केली,सामान्य आदिवासी बांधवांना काय मदत केली…?आपल्या केलेल्या कामाच्या जोरावर फक्त तिघांन पैकी राजेश पाटील निवडणूक लढवताना दिसत आहेत.त्यानाही मतदान किती होते ते पाहणे गरजेचे आहे.परराज्यातून आलेल्या स्टार प्रचारकांमुळे त्यांच्याच उपऱ्यांन गरीब बेरोजगारांना त्रास होणार आहे.त्या कडे आता सगळ्याचं लक्ष लागलेले आहे ते वीस तारखे च्या मतदाना कडे…?