पालघर | जावेद लुलानिया
पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरशेत, शेलार पाडा येथिल रमा भगत यांना गावातील सरपंच आणि गावकर्यांनी घर लुटून जबरी मारहाण केली, असताना, सुद्धा त्यांची फिर्याद न घेता, सरपंचांच्या दबावाला बळी पडून पोलीस अंमलदार यांनी मारहाण करणाऱ्या सामनेवाले यांची खोटी तक्रार घेऊन मार खाणाऱ्या फिर्यादी विरोधात दाखल करून घेतली आहे.यातील हकीकत अशी की जयवंती शेलार यांना दोन्ही मुली असून त्यांच्या दोन्ही मुली रमा आणि लाडकू यांना घराचा आणि जागेचा हिस्सा देण्यास सरपंच विलास घाटाळ आणि काही गावकर्यांचा विरोध आहे. म्हणून त्यांनी रमा यांच्या घरावर हल्ला करून तुम्ही घर जावई येथे नकोत, म्हणून घराची तोड-फोड करून त्यांना घरातना हिसकावून घर फोडून आणि लूट करून मारहाण केली, या मारहाणीत रमा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कपाटात असलेले पैसे हे लुटून नेले.
त्या वेळी घरात असलेल्या सर्व व्यक्तींना बेशुद्ध पडे पर्यंत मारहाण केली. त्या मारहाणीत रमा आणि तिचा नवरा हे वेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांचे आलेले वैद्यकीय अहवाल पाहून सुद्धा पोलिसांनी आणि मनोर पोलीस प्रभारी यांनी विरोधी असलेले सरपंच आणि इतरांन वर गुन्हा दाखल केला नाही.
मारहाण झाल्यावर चार तासा नंतर पोलीस आले.आणि साधी तक्रार दाखल करून घेतली आहे.त्यात घर उद्वस्त केल्याचे आणि दरोडा घातल्याचे उल्लेख केला नाही.या गंभीर गुन्हाचा तपास करण्यात पोलीस चाल ढकल करत असल्याचे रमा भगत यांची मुलगी शर्मिला भगत यांचे म्हणेने आहे.या बाबत भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी उपविभागीय अधिकारी पालघर नीता पाडवी यांना चौकशी करून कारवाई करण्याची विनंती केली.