१७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिक्षक संचालित शिक्षण संस्थेचे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा, तालुका वाडा, जिल्हा पालघर, समाजकल्याण विभाग, पंचायत समिती वाडा शिक्षण विभाग, आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्हा परिषद चे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर वाडा येथे व्यसनमुक्तीची दिंडी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे शिक्षक संचालित शिक्षण संस्थेचे सरचिटणीस मा.विशाल कुलकर्णी, कोषाध्यक्ष मा.जगदीश चित्ते, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर चे मुख्याध्यापक एस. जी. महाजन, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय चे उपप्राचार्य पाडवी सर, समाजकल्याण विभागाचे प्रतिनिधी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा समन्वयक श्री मिलिंद पाटील, उपस्थित होते.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी “जीवनाला हो म्हणा अंमली पदार्थांना नाही म्हणा” अंमली पदार्थांच्या विरोधात वातावरण निर्मिती करत व्यसन सोडा माणसे जोडा तसेच आम्ही कोणतेही व्यसन करीत नाहीत… तुम्ही ही करू नका असे आवाहन उपस्थितांना केले.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर चे मुख्याध्यापक महाजन सरांनी सांगितले की युवकांना अंमली पदार्थ विरोधी मानसिकता निर्माण करणे युवकांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे.
माणसास शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते व्यसनाच्या चक्र व्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढून त्याला निर्व्यसनी बनवले हा उद्देश आहे. यावेळीची थीम “पुरावा स्पष्ट आहे: प्रतिबंधात गुंतवणूक करा” अशी आहे यावेळी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर चे उपमुख्याध्यापिका सौ.अर्चना सुर्यवंशी मँडम, पर्यवेक्षिका सौ. सुमन सूर्यवंशी श्री जितेंद्र जुलालसिंग पाटील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नशाबंदी मंडळाचे मिलिंद पाटील यांनी सांगितले की पालघर जिल्ह्यांतील ८ तालुक्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने व्यसनमुक्तीची दिंडी, पोस्टर प्रदर्शन व प्रत्रक वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अंमली पदार्थ विरोधी शपथ घेऊन करण्यात आली.