Palghar Nargrik

Breaking news

जव्हार वैशिष्ट्य पूर्ण सोलर योजनेत भ्रष्टाचार…? –अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगणमताने झाला भ्रष्टाचार…? Part 1

 

पालघर | मयूर ठाकूर
जव्हार नगरपरिषद हद्दीतील सोलर दिवे लावण्यासाठी माजी खासदार राजेंद्र गावित यांच्या फंडातून वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून कंत्राट हे गणेश इलेक्ट्रि.अँड कॉन्टॅक्टर शहादा, नंदुरबार यांना देण्यात आले होते. ते काम गणेश इलेक्ट्रि.अँड कॉन्टॅक्टर शहादा, नंदुरबार यांनी न करता पालघर वेवर येथिल सब कंत्राटदार यांनी केलेले असल्याचे समोर आले आहे. गणेश इलेक्ट्रि.अँड कॉन्टॅक्टर शहादा, नंदुरबार यांचे मालक गणेश पाटील यांच्या म्हणण्या नुसार माझ्या एजन्सी च्या नावावर कंत्राट घेतले होते. पण मी त्या ठिकाणी आलेलोच नाही मला माहित नाही कुठे दिवे लावले, कुठे पोल गाडले आहेत ते…? माझी फक्त एजन्सी च्या नावावर कॉन्ट्रॅक घेतले होते.एवढेच आहे…? त्यामुळे मला काहीच माहिती नाही. या वैशिष्ट्य पूर्ण योजनेत हे काम दिले आहे त्या कामाच्या चौकशी ची मागणी होत असून, या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे.या भ्रष्टाचारात नगरपरिषदेतील अभियंता यांनी कंत्राटदारावर लक्ष देण्याचे काम असताना, आपल्या कामात काम चुकार पणा केलेला असल्याचे समजले आहे…? अश्या भ्रष्ट अभियांत्यावर कारवाई करावी असे जव्हार येथिल समाज सेवक यांनी नाव न छापण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
प्रतिक्रिया /-
काम करत असताना, तो तो व्यक्ती कंत्राटदारचा व्यक्ती म्हणून काम करत होता, कागदोपत्री कुठेही सब कॉन्ट्रत्तर चा उल्लेख नाही आहे.
–प्रवीण जोंधळे,अभियंता, जव्हार नगर परिषद.
प्रतिक्रिया (२)/-
माझ्या एजन्सी च्या नावावर काम घेतले होते, मी कामाच्या ठिकाणी आलेलो नसून, मला कुठे दिवे आणि पोल गाडले आहेत ते माहिती नाही.
–गणेश पाटील, मालक, गणेश इलेक्ट्रि.अँड कॉन्टॅक्टर शहादा, नंदुरबार.

Leave a Comment