Palghar Nargrik

Breaking news

रक्षाबंधन चा भाजप च्या पालक मंत्र्यांना घरची भेट ……?

 

 

पालघर | प्रतिनिधी

भाजप पालघर चे पालक मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या रविंद्र चव्हानांना युतीतील शिवसेना नेते रामदास कदमांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत घरीच ओवाळणी घातलेली असून, पालघर च्या जनतेला आलेला अनुभव रामदास कदमाणी त्यांच्या तोंडून सांगितला असल्याचे समोर आले आहे. पालघर भाजपानी त्याचा निषेध विडिओ प्रसिद्ध केला असल्याचे समोर आले आहे. राज्याचे रस्ते मंत्री असलेले चव्हाण यांना आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिसतात, पण रस्त्यावरील खड्डे, अपूर्ण रस्ते दिसत नाहीत…? ही वस्तुस्थिती पालघर येथिल जनता दरबारात समोर आली आहे. जनता दरबारात तक्रार टोकन क्र.१५६ हे मुंबई अहमदाबाद महामार्गा बाबत असताना, एन एच ए आई ची कुठलीही तक्रार आलेली नाही. असे छातीठोक पत्रकार परिषदेत चव्हानांनी वक्तव्य केले होते. त्यांना फक्त नावाचे मंत्री असल्याचे बोलले जात आहे. पालघर जिल्हा भाजपचे कार्यकर्ते-पदाधिकारी-पालक मंत्री असल्याचे ते वारंवार सिद्ध करत आले आहेत.त्यात त्यांना सत्तेत असलेल्या साथीदाराने रक्षाबंधन निमित्त घरचा आहेर दिला आहे.

Leave a Comment