Palghar Nargrik

Breaking news

विक्रमगड मध्ये अवैध धंदे जोरात….?

पालघर जिल्ह्यात सध्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार आलेले असून, आपल्या पत्नीला आलेले ते पैसे जोर जबरदस्ती ने त्यांच्या कडून हिसकावून घेऊन, त्या पैशाने, जुगार,मटका, तिथली पोपट,खेळून त्या पैशाची दारू पिऊन आपल्या बायकोला मारणे हे कामं सद्या नवरे करत आहेत, आधीही आपली मेहनतीची कमाई जुगारात उडवून बायका मुलांना उपाशी मारणे हे कामं सुरु होते.आताही जिल्ह्यात तेच सुरु असून यावर पोलिस प्रशासनाचे लक्ष नसल्याचे समोर आले आहे.विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता, त्यांचे म्हणने आहे की तुम्ही आम्हाला लोकेशन द्या मी धाड टाकतो,म्हणून सांगितले आहे.तीन दिवसा नंतर ही कारवाई शून्य असल्याचे बोलले जात आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी जव्हार यांनी मी स्वतः टीम पाठवून कारवाई करतो असे आमच्या प्रतिनिधी शी बोलताना बोलले आहेत.या अवैध धंद्यावर कारवाई होऊन उपयोग काय…? आठ दिवसांनी हे अवैध धंदे पुन्हा नव्याने सुरु होतात. या वरून पोलिस प्रशासन कारवाई करते की कारवाई चे नाटक करते हे पाहणे गरजेचे आहे.

Leave a Comment