शिरगाव येथील आनंद वृद्धाश्रम येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साई गणेश गोविंदा पथक यांच्या माध्यमातून श्री.तन्मय गणेश संखे यांच्या संकल्पनेतून आश्रमातील कुटुंबीयांसोबत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला साई गणेश गोविंद पथक हे प्रत्येक वर्षी आश्रमातून सुरुवात करून नंतर पालघर, बोईसर ,वाणगाव डहाणू असा प्रवास करत परिसरातील दहीहंडी फोडण्यासाठी मार्गस्थ होतात. याप्रसंगी मोठ्या संख्येने साई गणेश गोविंदा पथकाचे सदस्य त्याचप्रमाणे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री. प्रशांत दादा पाटील, श्री समीर दादा पाटील, श्री नैवेद्य संखे श्री. विनीत मोरे ,श्री. भावीन कंसारा श्री. मयूर राऊत, श्री. जयेश राऊत, श्री. अमेय भोईर, श्री. हर्षद घरत उपस्थित होते. सौ. मनीषा कोटक मॅडम यांनी सर्वांचे स्वागत केले व उपस्थित त्यांनी मनीषा कोटक मॅडम यांच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले.