Palghar Nargrik

Breaking news

भ्रष्टाचारात लुटला पालघर जिल्हा…? सहा विधानसभा मतदार संघांचा लेखा जोखा…

पालघर विधानसभा (भाग १){मयूर ठाकूर}

पालघर विधानसभा मतदार संघ डहाणू ते सफाळे चा काही भाग असा समुद्र किनाऱ्याच्या बाजूने पसरलेला आहे.पूर्वी हा मतदार संघ पालघर तालुक्यासाठी मर्यादित होता,त्या वेळी ह्या मतदार संघावर शिवसेनेची एक हाती सत्ता होती.शिवसेनेच्या तत्कालीन नेत्या मनीषा निमकर यांची या मतदार संघावर मजबूत पकड होती. ती २००९ साली काँग्रेस च्या राजेंद्र गावितांनी मोडीत काढून,तत्कालीन आघाडी सरकार मध्ये राज्यमंत्री आणि नविन पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री पद मिळवले होते.२००९ नंतर २०१४ ला स्थानिक नेते कृष्णा घोडा यांनी गावितांनचा थोड्या मतांनी पराभव केला होता, त्या नंतर कृष्णा घोडा यांच्या निधना नंतर झालेल्या पोट निवडणुकीत गावितांनचा पराभव करून कृष्णा घोडाचे सुपुत्र अमित घोडा हे निवडून आले.त्या नंतर तत्कालीन खासदार चिंतामण वणगा यांच्या निधना नंतर त्यांचे पुत्र श्रीनिवास वणगा यांना हरवून राजेंद्र गावित हे निवडून आले आणि दिल्ली ला गेले, त्यानंतर पुन्हा एकदा युतीतुन भाजप मधून उडी मारून शिवसेना मार्गे ते दिल्लीला गेले.दिल्लीला जाताना आधी भाजपा आणि नंतर शिवसेना मार्गे ते दिल्लीला गेले आहेत.पण २०२४ च्या लोकसभेला गावितांना आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ असे गाजर देऊन, ऐन वेळेला माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांना उमेदवारी देऊन दिल्लीला पाठवले. त्या वरुण भाजपा-शिवसेना,यांच्यात एक टर्म पालघर खासदार तुमचा आणि एक टर्म आमचा असा समजोता झाल्या सारखे खासदार पद वाटून घेतले असल्याचे दिसून येते.तसेच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वणगा हे पालघर चे सध्याचे विद्यमान आमदार असून, आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी फक्त बस स्थानके उभारली असल्याचे समोर आले आहे. तसेच करोना काळात बोटीवर गेलेले मच्छिमार तांडेल यांनी आम्ही बोटीवर अडकलो आहेत, आम्हाला मदत करा म्हणून आपल्या आमदार श्रीनिवास वणगा यांना फोन केला होता, त्यांना तुम्ही अडकले तर मी काय करू…? तुम्हाला मी जायला सांगितलं होता का…? असा उलटा प्रश्न विचारून आपली जबाबदारी झटकण्याचे काम केले होते त्याचा व्हॉइस रेकॉर्डिंग वायरल झाल्या मुळे आमदार श्रीनिवास वणगा यांची मोठ्या प्रमाणावर गोची झाली होती. आमदार महोदयांनी आता पर्यंत आमदार निधी काही निवडक कंत्राटदार यांना वाटण्या व्यतिरिक्त कोणतेही कामं केली नसल्याचे मतदारांन मध्ये त्यांच्या विषयी नाराजीचा सुरु सुरु आहे.तसेच आपल्या बिंदास्त स्वभावामुळे ते आदिवासी जनजाती समुहाच अभ्यास करायला केनियाला गेले होते, तेथील त्यांच्या डान्स चा विडिओ देखिल वायरल झाला होता. म्हणून कामाच्या बाबतीत लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कडे कोणी जात नसल्याचे समोर आले आहे. तसेच ते आमदार असले तरी त्यांची सर्व सूत्र हे माजी जिल्हा प्रमुख राजेश शाह हे हलवताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी वरळी हिट अँड रन प्रकरणात राजेश शाह यांच्या मुलाचे अजबदार कृत्य या मुळे राजेश शाह हे आपले उपनेते पद गमावून बसले आहेत. त्या मुळे राजेश शाह यांची भिस्त ही आमदार श्रीनिवास वणगा यांच्यावर जास्त आहे.
या पालघर विधानसभा मतदार संघावर शिवसेना शिंदे गटाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढान यांच्या कडेही संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.तसेच पालघर च्या माजी आमदार राहिलेल्या आणि राज्य मंत्री असलेल्या मनीषा निमकरही बहुजन विकास आघाडीतून संभाव्य उमेदवार असणार आहेत. शिवसेना शिंदे गट ही जागा भाजपाला सोडणार की स्वतः लढवणार या वरुण वैदेही वाढान, श्रीनिवास वणगा की राजेंद्र गावित हे उमेदवार ठरणार आहेत. सध्या भाजप वासी असलेले गावित तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची चाचपणी करताना दिसत आहेत. आपल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे मत जाणून घेत आहेत. कार्यकर्त्यांना मी अपक्ष लढलो तर निवडून येईल का…? तुम्ही मला कशी मदत करणार….? अश्या प्रकारचे प्रश्न विचारून. निवडणुकीचा आढावा घेत आहेत.राष्ट्रवादी दोन्ही गटा कडे पालघर विधानसभा मतदार संघसाठी उमेदवार नसल्याचे बोलले जात आहे. तसेच उबाठा शिवसेना यांचाही संभाव्य उमेदवार हे लोकसभेत सपाटून मार खालेल्या भारती कामडी असतील हे जग जाहीर आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षा तर्फे गावितांच्या मुलाला जिल्हा परिषद वनई पोट निवडणुकीत धोबी पछाड दाखवणारी वर्षा वायदा ही संभाव्य उमेदवार असू शकते.काँग्रेस तर्फे युवा काँग्रेस च्या कॅप्टन सत्यम ठाकूर यांचा मोठा पाठिंबा वर्षा वायडा यांना असून आर्थिक ताकदही ते त्यांच्या मागे उभी करू शकतात. वनई जिल्हा परिषद सदस्य पोट निवडणुकीत वर्षा वायडा यांनी रोहित गावित यांना निवडणुकीत मागे पडून दोन नंबर ची सर्वाधित मते मिळवली होती, तर रोहित गावित तिसऱ्या नंबर वर फेकले गेले होते. आता विधानसभेत पुन्हा इतिहास घडवण्या साठी वर्षा वायडा तयार असल्याचे बोलले जात आहे.त्यांना काँग्रेस मधून मागच्या वेळीचे उमेदवार योगेश नम हे सुद्धा संभाव्य उमेदवार आहेत.या व्यतिरिक्त संभाव्य उमेदवार आम्ही वेळोवेळी जाहीर करू…..!

Leave a Comment