Palghar Nargrik

Breaking news

भाजपा शहराध्यक्षाच्या प्रभागात दिवाबत्ती खांबावर लटकलेलीच….?

 

पालघर | मयूर ठाकूर

भाजपा पालघर शहर अध्यक्षाच्या कार्यालयच्या रस्त्यात आणि त्यांच्या पत्नी ज्या प्रभागाच्या नगरसेविका होत्या त्या प्रभागात नगरपरिषदेचे दिवाबत्ती खांबावर लटकलेलीच दिसून येत आहे. या आधीही जेव्हा त्या विद्यमान नगरसेविका होत्या तेव्हाही भाजपचे पालक मंत्री त्यांच्या कार्यालयाचे उदघाट्न करायला आले होते. तेव्हा ढोल ताशा वाजवत ते चालत कार्यालयात पर्यंत गेले तेव्हाही दिवाबत्ती च्या खांबावर लाईट चे फोकस वायरीला लटकलेले होते. भाजपच्या पालक मंत्र्यांना ते दिसलें नाही, म्हणून त्यांची बढती शहर अध्यक्ष पदावर केली. आपल्या निवडक कंत्राटदारांची कामे अधिकाऱ्यांकडून कशी करायची हे माहित असणाऱ्या शहर अध्यक्षाला आपल्या बायकोच्या प्रभागात काय आहे काय नाही कुठे लोकांना त्रास आहे हे सुद्धा माहित नसावे. आता गणपती उत्सव सूरु असून, या लटकलेल्या लाईट फोकस मुळे नागरिकांचा अपघात होऊ शकतो….? मी आता नगरसेविका नाही, नगरपरिषदेवर प्रशासक आहे…? असे बोलले जाते, पण आपल्या ओळखीच्या कंत्राटदाराचे बिल पास करून घ्यायला आपण माजी नगरसेविका आहात ना…? तेव्हा नगरपरिषदेवर प्रशासक नसतो, तेव्हा तुम्ही माजी नगरसेविका आणि सत्ताधारी पक्षाचे शहर अध्यक्ष असतात ना…? मग कामे पण करा, पुढच्या निवडणुकीला तुम्हांला आणि तुमच्या पक्षाला सामोरे जायचे आहे.

Leave a Comment