Palghar Nargrik

Breaking news

परवानगी स्पीकर ची पण प्रत्यक्षात लावला डी जे…? –सर्वोच्च्य न्यायालयाच्या निर्णयाचे खुलेआम उल्लंघन –ध्वनी प्रदूषण रोखण्यात प्रशासन अपयशी  –करमणुक कर भरत नसल्याने शासनाचा महसूलात घट

पालघर | मयूर ठाकूर
जिल्ह्यात आता गणेशउत्सव सुरु असल्याने उत्सवाचे दिवस सुरु असून त्यात आता पूर्वी सारखे ढोल ताशे आणि बंजो न वाजवता मोठ्या आवाजात डीजे लावण्यात येत आहे.त्यात उत्सवात डीजे वाजवताना आवश्यक असलेली परवानगी प्रशासना कडून घेतली जात नाही, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने प्रशासन डी जे ला परवानगी देत नसल्याने स्पीकर चा नावाने प्रशासना कडून परवानगी घेऊन डी जे लावण्यात येत आहे. त्या साठी करमणूक करही भरला जात नाही.शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडविला जातो ,त्या मुळे जिल्ह्यात अनधिकृतपणे डीजे लावण्यात येत आहेत. जिल्ह्यात त्या मुळे ध्वनी प्रदूषण होत असून, सर्वोच्च्य न्यायालयाच्या निर्णयाचे खुलेआम उल्लंघन होत आहे.आणि प्रशासनाचे त्यावर अंकुश नसल्याचे समोर आले आहे.त्या संबधी नागरिक रात्री मोठ्या आवाजात डीजे वाजतो म्हणून पोलिस स्टेशन ला फोन करून तक्रार करत असतात,पण पोलिस ठाण्यातील अमलदार हे त्यांचा उत्सव आहे, रोज थोडी वाजवतील,आजच्या दिवस डीजे वाजवतील आजच्या दिवस तेवढा त्रास सहन करा,असे म्हणून बोळवण करत असतात,तरी या संबधी प्रशासन डीजे व्यवसायीक आणि ऑपरेटर यांच्यावर कारवाई करणार का..? असा प्रश्न नागरिकांन कडून विचारण्यात येत आहे.

डीजेचा आवाज हा ८० डेसिबल च्या पुढे नसावा असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. पण डीजे ऑपरेटर हा आवाज २००-५०० डेसिबल पर्यंत ठेवतात,रात्री दहा नंतरही डीजे मोठ्याने जोरात सुरु असतो.त्यामुळे आजू बाजूला असलेल्या वयोवृद्धांना त्याचा त्रास होतो.ज्या कार्यक्रमात डीजे लावण्यात आला आहे,त्या कार्यक्रमाचे आयोजक हि परिसरातील नागरिकांनच्या या त्रासाच्या गंभीर बाबी कडे लक्ष देत नाहीत.त्यामुळे सर्वोच्च्य न्यायालयाच्या निर्णयाचे खुलेआम उल्लंघन होत आहे.तसेच डीजे लावण्यासाठी करमणूक कर भरणे गरजेचे असते,त्यात शासनाचा महसूलही बुडविला जात आहे.पोलिस आल्यावर त्यांना आमच्या कडे परवानगी आहे, असे बोलून राजकीय दबाव टाकून परत पाठवले जाते.त्यामुळे कोरोना काळात मंडप डीजे व्यवसाईक यांचा धंदा डबघाईला आलेला असताना,तेव्हा डीजे व्यवसाईक आणि ऑपरेटर यांच्या बाबत नागरिकांन मध्ये सहानभूतीची लाट आली होती.पण आता तेच नागरिक, मोठ्या आवाजाने डीजे लावणाऱ्या डीजे व्यवसाईकांना डीजेच्या आवाजामुळे अपशब्द बोलत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया डीजेचा आवाज हा ८० डेसिबल च्या पुढे नसावा,तसेच रात्री १० नंतर डीजे वाजविण्यास बंदी घातलेली असून, पण डीजे ऑपरेटर डीजेचा आवाज ४००-५०० डेसिबल पर्यंत आवाज ठेवतात,रात्री दहा नंतरही डीजे जोरात सुरु असतो.त्या मुळे ध्वनी प्रदूषण होते.

काही दिवसापूर्वी दहीहंडीच्या वेळीही मोठ्याने डीजे लावण्यात आल्याने जेष्ठ नागरिकांना त्याचा आरोग्यावर परिणाम झाला होता. आता गणपती उत्सवात मोठ्या आवाजात डीजे लावण्यास उत्साही कार्यकर्ते पुढे असतील, पण त्याचा परिणाम जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर होईल, हा विचार आयोजक करतील का..?तसेच स्पीकर च्या नावाने परवानगी घेऊन कायदा पाळतात असे दाखवले जाते. कायदा बनण्या अगोदर त्याच्या पळवाटा बनवल्या जातात.काही अधिकारी कर्मचारी हेच असे स्पीकर चे अर्ज करा, आणि डी जे वाजवा असे सांगतात.

 

Leave a Comment