पालघर | जावेद लुलानिया
सद्या गणपती महोत्सव सुरु असून मुस्लिम समाजाची ईड उल नबी ही ईद १६ सप्टेंबर २०२४ रोजी येत आहे.हिंदू बांधवांची गणपती विसर्जन अनंत चतुर्थी ही १७ सप्टेंबर रोजी येत असून, मुस्लिम समाज पालघर आणि मनोर ह्या ठिकाणी जुलूस काढणार असून ह्या साठी जिल्हा प्रशासनाने दिनांक १६ सप्टेंबर रोजी,ईड उल नबी चा जुलूस काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
या बाबत मुस्लिम डेमोक्रतिक पार्टी, आणि इमान संघटना यांनी या बाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.त्या निवेदनाच्या आधारे आज सुन्नी जामा मस्जिद चे ट्रस्टी हाजी आरिफ धनानी, आणि हाजी हनीफ लुलानिया तसेच रफीक लुलानिया यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले,त्या निवेदनात गणेश मंडळाचे नाहरकत पत्र ही जोडले आहे, त्या नाहरकत पत्रात गणेश मंडळाना त्यांच्या मंडपा जवळून ईद उल नबी ची रैली गेल्यास कुठलीही हरकत नसणार आहे. उलट पक्षी गणेश मंडळे या रैली चे स्वागत करणार असल्याचे पत्रा द्वारे म्हंटले आहे.आणि पालघर शहराची हिंदू मुस्लिम ऐकतेची परंपरा कायम राखणार आहेत.असा संदेश देण्यात येणार आहे.
या बाबत मध्य पालघर गणेश उत्सव मंडळ तसेच जुना पालघर गणेश मंडळ आणि सुन्नी जामा मस्जिद यांनी हाजी जावेद लुलानिया यांना पत्र दिले, त्या पत्राच्या आधारे ईद उल नबीची रैली १६ तारखेला निघणार आहे.हे निवेदन दिल्या नंतर पालघर जिल्ह्या पुरता ईडीची सुट्टी ही १६ सप्टेंबर ला जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे.