⏩ दिनांक व वेळ- आज दिनांक 16/09/2024रोजी 18.00 ते 18.35 वा.
⏩ ठिकाण – पालघर रेल्वे स्टेशन मेन गेट समोर
1) महिला प्रवाशांना COTO ॲप डाऊनलोड करण्याबाबत सुरक्षा जनजागृती,
2) खाकितील सखी उपक्रमाबाबत जनजागृती,
3) आर्थिक फसवणूक विषयांबाबत खालील प्रमाणे जनजागृती करण्यात आली.
1) महिलांच्या सुरक्षेकरीता रात्रीच्या व पहाटेच्या वेळी महिलांकरीता राखीव डब्यांमध्ये रेल्वे पोलीसांकडुन सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
2) महिला प्रवाशांनी महिलांकरीता राखीव असलेल्या डब्यातुन प्रवास करावा.
3) महिलांनी एकटे राखीव डब्यातुन प्रवास करतांना सुरक्षा कर्मचारी डब्यामध्ये आहे यांची खात्री करावी. सुरक्षा कर्मचारी नसल्यास, प्रवाशी असलेल्या डब्यातुन प्रवास करावा.
4) रेल्वे स्टेशन अथवा रेल्वे प्रवासात कोणत्याही प्रकारची छेडछाडीची घटना होत असल्यास त्याची माहिती तात्काळ कर्तव्यावरील पोलीस अंमलदार अथवा रेल्वे पोलीस हेल्पलाईन क्र. 1512 यांना कळवावी तसेच खाकी तील सखी नेमलेले महिला पोलीस आमदार यांना तात्काळ फोन करावा .
5) प्रवासादरम्यान दरवाजात लटकुन प्रवास करु नये त्यामुळे जिवीतास तसेच मालमत्तेस धोका होऊ शकतो.
वरीप्रमाणे महिला प्रवासी यांनी पोलीसांचे कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमात आमच्या मार्गदर्शनाखाली म. पोलीस उप निरीक्षक कानपिळे wpc जोपळे
सदरचा कार्यक्रम शांततेत पार पडला.