पालघर | जावेद लुलानिया
पालघर जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे खाडीतील गाळ काढून नौका नयन मार्ग सुकर करण्यासाठी परवानगी दिलेली असून, या परवानगीच्या आडून गाळा ऐवजी किनाऱ्यावरील रेती उपसा करून गाळाच्या स्वामींत्व धनाच्या पावत्या बनवून रेतीची वाहतूक,करण्यासाठी कायद्याच्या पळवाटा शोधल्या जातात. २१ आणि २२ सप्टेंबर शनिवार रविवार महसूल मंडळ अधिकारी कार्यालय उघडे ठेऊन,फक्त रेतीच्या गाड्या तपासण्याची नाटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे.