पालघर | मयूर ठाकूर (भाग १)
पालघर चे तत्कालीन तहसीलदार सुनिल शिंदे आणि त्यांचे हस्तक यांच्या विरोधात पालघर चे एक नागरिक तत्कालीन पालघरचे तहसीलदार सुनिल शिंदे आणि त्यांचे असलेले हस्तक, ज्या मध्ये काही राजकीय नेते, मोठ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी,मा.नगरसेवक,भुमाफिया,बिल्डर यांचा समावेश आहे. याचिका कर्ते यांनी सुनिल शिंदे यांच्या कार्यकाळात तालुका महसूल विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप याचिका करते यांनी केला आहे. त्या संबधी सर्व पुरावे त्यांनी उच्चन्यायालयात सादर केल्याचे, आमच्या प्रतिनिधी शी बोलताना त्यांनी सांगितले.तत्कालीन पालघर चे तहसीलदार सुनिल शिंदे यांनी काही हस्तक यांच्या मार्फत काही जागा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार आणि नामी बेनामी संपत्तीचा समावेश असल्याचे याचिका कर्ते यांचे म्हणने आहे. ह्या भ्रष्टाचाराची पाले मुळे पालघर तालुक्यापुरता मर्यादित नसून याचे पाळे मुळे जिल्हा मुख्यालया पर्यंत गेले असल्याची शक्यता, याचिका कर्ते यांचे म्हणने आहे.
कोट /-
मला या संदर्भात काहीही माहिती नाही, मला कुठलीही नोटीस वैगेरे काहीही आले नाही.
–सुनिल शिंदे, तत्कालीन तहसीलदार, पालघर.