पालघर | मयूर ठाकूर
पालघर कचेरी रोड वरील भास्कर भवन तोडून तेथे नविन इमारत बांधकामचे कामं सुरु असून या ठिकाणी खूप दिवसापासून खोद कामं करून ठेवलेले असून,त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून, त्यावर हिरवळ साचून दासांच्या अळ्या झाल्या होत्या, आणि डेंगू मलेरिया चे डासांचे प्रमाण वाढून आजू बाजूचे नागरिक आजारी पडत होते. म्हणून साप्ताहिक पालघर नागरिक च्या संपादक जावेद लुलानिया यांनी त्याची तक्रार नगरपरिषद आरोग्य विभागाकडे केली होती. त्यावर नगरपरिषद चे मुख्याधिकारी गायकवाड आणि वरिष्ठ अधिकारी परदेशीं, उमाकांत पाटील यांनी दखल घेऊन आज कारवाई केली आहे.