वाडा | प्रतिनिधी
वाडा तालुक्यात खांजुळे वेलफेयर ट्रस्ट आणि भूमिपुत्र संघटना,मानवाधिकार मिशन,आणि यांनी परळी आश्रम शाळा सभागृह येथे सिकलसेल तपासणी शिबीर आयोजित केले होते.या शिबिरात पन्नास विध्यार्थी यांची तपासणी करण्यात आली असून तीन जण सिकलसेल नी ग्रस्त असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आल्याचे वाडा तालुका आरोग्य अधिकारी शरयू तुपकर यांनी सांगितले.हे शिबीर खांजुळे वेलफेयर ट्रस्ट आणि भूमिपुत्र संघटना,मानवाधिकार मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. सिकलसेल हा अनिवांशिक आजार आहे. या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरयू तुपकर,परळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. शिरीष खैरनार,पंडित पावरा, जि प चे अधिकारी इंदर जाधव, रेखा तांबेरा, मलेरिया पर्यवेक्षक संजय पाटील, सुनिल कांबळे,आणि खांजुळे वेलफेयर ट्रस्ट चे लक्ष्मीकांत पाटील,भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी, भोळा आळशी, विजय बसवत, योगेश वाघ मानवाधिकार मिशन,चे हर्बन्स सिंग नन्नाडे, रवीश नाचन हे उपस्थित होते.