पालघर | मयूर ठाकूर
पालघर माहीम भागातील रिलायन्स पेट्रो केमिकल ला टेक्सटाईल पार्क च्या नावाखाली जमीन देण्याचा घाट युती सरकार नी घातला असून त्याच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पेसा अंतर्गत गावात काही करायचे असल्यास ग्रामसभेची परवानगी आवश्यक असताना जिल्हाधिकारी गोविंद बोडके मनमानी कारभार करत असल्याचे मोर्च्यात सहभागी नागरिकांचे म्हणने होते.