पालघर | प्रतिनिधी
पालघर शहरात नागरिक, शालेय विध्यार्थी, रुग्ण हे सध्या वाहतूक कोंडी या भयंकर आजाराचा सामना करत असून,पाचबत्ती ते माहीम रोड, सातपाटी रोड, चार रस्ता ते बोईसर रोड, माहीम बायपास,देवीशाह रोड या रस्त्यावर हमखास वाहतूक कोंडी (ट्राफिक )मिळतेच मिळते, सकाळ संध्याकाळ रात्री चे दहा वाजेपर्यंत नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोच आहे. या वाहतूक कोंडीचे डॉक्टर वाहतूक प्रभारी यांना प्रशासनाने व्हीआईपी ड्युटी(त्यांची वाहतूक व्यवस्था सांभाळणे, त्यांना कुठे ट्राफिक मध्ये अडकायला न देने.)दिल्याने, वाहतूक सांभाळायची जबाबदारी, त्यांचे शिलेदार वाहतूक पोलिसांवर पडत आहे. त्यात नविन भरती पोलिस आपले कर्तव्याच्या विपरीत फक्त दंड वसुली च्या टार्गेट च्या पूर्ती साठी पछाडलेले असतात. दंड वसुलीच्या नादात मूळ कर्तव्य वाहतूक सुळरीत करणे ते विसरून जाताना दिसत आहेत.
या वाहतूक कोंडी साठी पोलिसच जबाबदार आहेत असे नाही, तर
त्याला नगरपरिषद प्रशासन सुद्धा तेवढेच जबाबदार आहे. शिवाजी चौक चार रस्ता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, या रस्त्यावर अनधिकृत बॅनर व्यवसायिकाने बॅनर लावून रस्ता व्यपला आहे. त्याच्या विरोधात प्रशासन कुठलीही कारवाई करायला तयार नाही.कारण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेत्यांचे बॅनर त्याने समोर लावले आहेत. त्या बॅनर वर कारवाई करायला प्रशासन घाबरत असल्याचे दिसत आहे.नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभागावर तर सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपरिषद वर आरोप करत आहेत. आता पाहणे गरजेचे आहे की वाहतूक कोंडी कशी फुटेल….?