बोईसर | प्रतिनिधी
बोईसर पूर्वेकडील दगड खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागझरी ग्रामपंचायत अंतर्गत एका दगडखाणीत एका ठेकेदाराचा उंचावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे.
जयेश मोहन काकड (वय 32) रा. काकडपाडा (नागझरी) असे मयत पावलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. नेहमीप्रमाणे जयेश खदानीच्यावर मातीचा काढण्याचे काम करत होता. दरम्यान त्याचा तोळ जाऊन तो ७० ते ८० फुटावरून दगड खाणीत खाली कोसळून गंभीर जखमी झाला होता.
नागझरी येथील अधिकारी लाईफ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आल्यानंतर शवविच्छेदनासाठी मनोर येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेची मनोर पोलिसांनी नोंद करुन घेत अधिक तपास सुरू केला आहे.
दरम्यान, दगडखाणींवर काम करणाऱ्या कामगारांना दगडखाण मालक अथवा चालकांन कडून आवश्यक साधने पुरवली जात नसल्यानेच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे.
ठळक /-
समाज सेवक विनोद अधिकारी यांच्या आस्थापनेत कामं करणाऱ्या कामगारांना सर्व सोई सुविधा पुरविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. कामगारांना मेडिकल सुविधा, इन्शुरन्स,आरोग्य,मुलांचे शिक्षण या सुविधा अधिकारी यांच्या मार्फत पुरविण्यात येत आहेत.