Palghar Nargrik

Breaking news

महा युतीचा महा विकास…

पालघर | प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा सभा निवडणुका जाहीर झाल्या असून, आमच्या सरकार ने कसे काम केले याचे रिपोर्ट कार्ड आज शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी पत्रकार परिषद घेऊन सादर केले. या पत्रकार परिषदेच्या वेळी, पालघर चे आमदार श्रीनिवास वणगा शिवसेना प्रवक्ते केदार काळे, युवा जिल्हा अध्यक्ष साईराज पाटील,सुशिल चुरी, रवि चौधरी, राहुल घरत, वसंत बसरा, आणि शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी बोलताना कुंदन संखे यांनी अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार ने केलेली कामे आणि आताच्या महा युती सरकार ने केलेली कामे यांच्या कामांचा आलेख दाखवून आमचे शिंदे सरकार कसे लोकांभिमुख आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.प्रत्यक्षात निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्या नंतर चा प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे.याला आपण महा युतीचा महाविकास संबोधू शकतो.

Leave a Comment