राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ( राष्ट्रवादी SP) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह भाजपमधून आलेल्या बड्या नेत्याला उमेदवारी मिळली आहे. बारामतीत युगेंद्र पवार अजित पवार यांच्याविरोधात लढणार आहेत.महाविकास आघाडीची ही दुसरी यादी आहे. महाविकास आघाडीचा समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ नसल्याचं जागावाटपाच्या सूत्रावरून स्पष्ट होतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 85, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 85 जागा, तर काँग्रेसला 85 जागा असा हा फॉर्म्युला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आपली 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तिन्ही पक्षांना 270 जागा मिळणार आहेत. तर मित्रपक्षांना 18 जागांवर उमेदवार देता येणार आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार
आज राज्यभरात महाविकास आघाडी आणि महायुतीसह अन्य उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेत.. यामध्ये जयंतराव पाटील यांनी इस्लामपूरमधून, मंत्री छगन भुजबळांनी येवल्यातून तर जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा कळवा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय… त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी, गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण, संजय राठोडांनी दिग्रस.. विजयकुमार गावित यांनी नंदुरबारमधून तर मनसेच्या राजू पाटील यांनी कल्याण ग्रामिण मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेय..