Palghar Nargrik

Breaking news

उपऱ्या गावितांसाठी निष्ठावंत भूमिपुत्र श्रीनिवासचा बळी….

पालघर | प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून कोणाला कुठे तिकीट मिळणार या कडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पालघर जिल्ह्यात एकी कडे निष्ठावंताना डावलून उपरे पक्ष बदलू उमेदवार यांना महत्व देण्यात येते असे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांन पैकी एक असलेले पालघर चे विद्यमान श्रीनिवास वणगा यांना तिकीट वाटपाट डावळण्यात आले असून, त्यांच्या बदली पालघर विधानसभेचे तिकीट काँग्रेसचे मंत्री पद उपभोगून भाजपा वासी आणि नंतर शिवसेना पुन्हा भाजपा आणि परत शिवसेना शिंदे गट असा प्रवास करणाऱ्या राजेंद्र गावितांना दिले आहे. त्या मुळे वणगा नाराज झाले असून ते डिप्रेशन मध्ये गेल्याचे समजले आहे.

“मी शिंदे साहेबांना त्या वेळी साथ दिली, आणि उद्धव साहेबांना फसवले, याचा मला पश्चाताप होतोय. असे म्हणून ते पत्रकाराणं समोरच ओकसा बोकसी रडायला लागले.”

 

उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते मात्र एकनाथ शिंदेंनी आम्हाला फसवलं

28oct Shrinivas Vanaga family

पालघर – पालघर चे आमदार श्रीनिवास वनगा यांचे शिवसेना शिंदे गटाने तिकीट कापलं . वनगा कालपासून डिप्रेशन मध्ये असून सारखं आत्महत्या करण्याच्या गोष्टी करत असल्याची वनगा यांच्या पत्नीची पत्रकार परिषदेत माहिती . एकनाथ शिंदे यांनी आम्हाला फसवलं . उद्धव ठाकरे सारख्या देव माणसाला सोडून आपले पती एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले ही त्यांची घोडचूक . माझ्या मुलाच्या वाढदिवसाचं कारण सांगून बंड करणारे आमदार गुवाहाटी ला गेले मात्र माझ्याच मिस्टरांना का फसवलं . श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांचा एकनाथ शिंदे यांना सवाल . 40 पैकी 39 आमदारांना तिकीट दिलं मग माझ्या पतीचा राजकीय बळी का घेतला . पत्रकार परिषदेत वनगा कुटुंबीयांना अश्रू अनावर .

Leave a Comment