पालघर | मयूर ठाकूर
पालघर जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले असून, सर्वच पक्षाचे छुप्या युत्या आघाड्या या मतदारांना अंधारात ठेऊन होताना दिसत आहेत.त्यात काही मतदार हे फक्त पैश्याला आणि दारूला भुलून आपले किमती मत विकून रिकामी होऊन जातात.काल पर्यंत जे मांडीला मांडी लावून बसत होते, ते आता निवडणुकीत एकमेकांन समोर उभे आहेत.अगदी खालच्या पातळीवर जाऊन कार्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. “मी मोठं ज्यांना केल, आता तेच माझ्यावर उलटले..?” “माझा हात पकडून राजकारणात आले.”असे एक ना अनेक आरोप आपल्या विरोधी उमेदवारावर होताना दिसत आहेत. पण दिव्या खाली अंधार या म्हणीची प्रत्यक्ष अनुभूती सर्वाना समोर येताना दिसत आहे.त्या मुळे सध्या मतदारांना पडलेला प्रश्न एकच आहे, तो म्हणजे लायक उमेदवार कोण…? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अजून एक मोठा यक्ष प्रश्न डोळ्या समोर उभा राहतो,तो म्हणजे बिकाऊ मतदार…? ज्यांनी कधी मटण दारू बघितली नाही, असे मतदार आपले मत पाचशे-हजार रुपयांना विकताना दिसत आहेत.आपले कामं कोणी फुकटात केले नाही, मग मी फुकटच मतदान का करु…?ह्याच प्रश्न मतदाराच्या मनात घर करून बसला आहे. त्याचे उत्तर शिक्षित मतदार हे असून, अशिक्षित मतदारांचा फायदा हे लायक नसलेले उमेदवार घेताना दिसत आहेत.मतदाराला शिक्षित न करता मतदार बनवून फायदा कसा घ्यायाचा हे शिकणे म्हणजे राजकारणाच्या शाळेची पहिली पायरी चढणे होय. त्या मुळे मतदारांनी तरी बिकाऊ होऊन आपले मत अयोग्य उमेदवाराला देऊ नये.हे न करता आपले मत योग्य लायक उमेदवाराला देऊ हा संकल्प करावा.