Palghar Nargrik

Breaking news

२५ हजारांचं बक्षीस – माणुसकी की जाहिरात? रोज मरणाऱ्यांकडे दुर्लक्ष, आणि एका फोटोमुळे उद्धार?

पालघर-जव्हार-वाडा-भिवंडी-मुंबई-अहमदाबाद महामार्ग | NH 48

देशाचे महामंत्री नितीन गडकरी साहेब म्हणाले:

“अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्याला मिळतील २५,००० रुपये!”
वा रे सिस्टीम… आता माणुसकीही इनामावर विकली जाते?

आपले खासदार सावरा साहेब – एका महिलेला उचललं, फोटो काढला, आणि पेपरमध्ये झळकवलं!
रोज जे लोक मरत आहेत, त्यांच्या घरी आजही अंधार आहे… पण त्यांचा फोटो कुठे आहे साहेब?

मग प्रश्न असा आहे:

  • रोज NH 48 वर होणाऱ्या मृत्यूचं काय?
  • रोज अ‍ॅम्बुलन्स अडकतात, नवजात बाळं गाडीतच मरतात – त्यांचं बक्षीस कोण देणार?
  • गडकरी साहेब, खड्ड्यांनी बळी गेलेल्या लोकांसाठी काय योजना आहे?
  • आणि सावरा साहेब, तुमचं हे फोटोनाट्य कधी थांबणार?
  • हे सगळं फक्त प्रसिद्धीसाठी आहे का? की “फोटो काढा – इनाम मिळवा” योजना सुरू झाली आहे?

कलेक्टर ऑफिस, RTO, पोलीस, आमदार, खासदार – सगळे मिटिंग घेतात,
पण रस्त्यांवर अजूनही खड्ड्यांचा सुकाळ आहे!

जनता विचारते आहे:

  • “खड्ड्यात मरणाऱ्यांचं आयुष्य एवढं स्वस्त आहे का?”
  • “२५ हजारांचं आमिष दाखवून अजून किती नाटक करणार?”
  • “ही सेवा आहे की मृत्यूचं मार्केटिंग?”

#इनाम_नको_सुधारणा_हवी
#फोटो_नको_जबाबदारी_हवी

पालघर नागरिक- संपादक: जावेद लुलानिया, पालघर



पालघर टाउन में विश्वास का दूसरा नाम — KK GROUP

SINCE 1999

हम हैं KK GROUP – जहां हर ईंट में बसा है भरोसा, हर मंज़िल में झलकता है अनुभव।

पालघर के दिल में पिछले 25 सालों से लोगों का सपना साकार कर रहे हैं।

सच्चाई, गुणवत्ता और समय की पाबंदी – यही हमारी पहचान है।

आपके सपनों का आशियाना हो या कोई नया प्रोजेक्ट –

KK GROUP हमेशा तैयार है, आपके साथ, आपके लिए।

KK GROUP – PALGHAR KA VISHWASU BUILDER

Leave a Comment