Palghar Nargrik

Breaking news

पालघर जिल्ह्यातील रस्ते काम वेगात – वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी पोलिसांचे कडक आदेश!

पालघर | २५ एप्रिल २०२५ –

पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर नवीन रस्त्यांचे व सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, या कामांमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि जनतेला होणारा त्रास लक्षात घेता पालघर जिल्हा पोलिसांनी अत्यंत कडक नियोजन लागू केले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बालासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत सर्व ठेकेदार, पीडब्ल्यूडी अधिकारी, आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या की कायद्याचे व वाहतूक नियोजनाचे पालन न करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई केली जाईल.

 

महत्त्वाचे निर्णय:

  • एकाच वेळी एकाच भागातच काम करणे बंधनकारक; अन्यथा दंडात्मक कारवाई.
  • रस्ता खणताना पर्यायी मार्गाची स्पष्ट व्यवस्था असणे गरजेचे.
  • वाहतुकीस अडथळा होणार नाही यासाठी ट्रॅफिक वॉर्डन, सिग्नल लाइट, साईन बोर्ड लावणे बंधनकारक.
  • अँब्युलन्स, फायरब्रिगेड, पोलीस वाहनांसाठी मार्ग मोकळा ठेवणे आवश्यक.
  • कामाच्या ठिकाणी तात्काळ मदत मिळावी यासाठी अँब्युलन्स व क्रेन तैनात ठेवण्याचे आदेश.

जो ठेकेदार नियमांचे उल्लंघन करेल, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट चेतावणी पोलिसांनी दिली आहे.या निर्णयांमुळे पालघर जिल्ह्यातील रस्त्यांचे काम अधिक सुरळीत, नियोजित व सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

NHAI 48 इन्फॉर्मेशन ग्रुप पालघर…



पालघर टाउन में विश्वास का दूसरा नाम — KK GROUP

SINCE 1999

हम हैं KK GROUP – जहां हर ईंट में बसा है भरोसा, हर मंज़िल में झलकता है अनुभव।

पालघर के दिल में पिछले 25 सालों से लोगों का सपना साकार कर रहे हैं।

सच्चाई, गुणवत्ता और समय की पाबंदी – यही हमारी पहचान है।

आपके सपनों का आशियाना हो या कोई नया प्रोजेक्ट –

KK GROUP हमेशा तैयार है, आपके साथ, आपके लिए।

KK GROUP – PALGHAR KA VISHWASU BUILDER

Leave a Comment